तामिळनाडूतील ‘या’ मंदिराच्या उत्सवात कोसळली क्रेन; तीन जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवाला गालबोट लागले आहे. या मंदिराच्या उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या इथं किलीवेडी गावात ही घटना घडली आहे.

तामिळनाडूमधील मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवाला गालबोट लागले आहे. या मंदिराच्या उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या इथं किलीवेडी गावात ही घटना घडली आहे. शेकडो भाविका या मेळाव्यात हजर होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. (crane crashed in temple fest 3 dead in near nemili arakonam tamil nadu)

मिळालेल्या माहितीनुसार, किलीवेडी गावात मंडियमम्न मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवादरम्यान एका क्रेनच्या मदतीने भलामोठा हार आणला होता. मात्र, क्रेनला जिथे हार लटकलेला होता, त्यावर काही तरुण उभे होते. पण, अचानक क्रेन डाव्या बाजूला सरकली तेव्हा तोल जाऊन क्रेन खाली आदळली. अचानक क्रेन कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेत ज्योती बाबू या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, किलावथम भूपालन आणि मजूर मुठ (42) या मजुराचा क्रेनखाली दबून मृत्यू झाला. या अपघातात एका मुलीसह ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अरक्कोनम शासकीय रुग्णालय आणि एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, महत्त्वाची कागदपत्रं केली जप्त