घरदेश-विदेशCREDAI चा मोठा निर्णय, देशातील २.५ कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना देणार कोरोना लस

CREDAI चा मोठा निर्णय, देशातील २.५ कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना देणार कोरोना लस

Subscribe

केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेला हातभार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतो आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, वयोवृद्ध गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोरोना लस देण्यात येत आहे. त्यामुळे अजूनही अनेक क्षेत्रातील नागरिकांना कोरोना लस देण्यात आली नाही. देशातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. बाधकाम क्षेत्रातील अग्रेसर आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना असलेल्या क्रेडाई (CREDAI) संस्थेने आपल्या २.५ कोटी कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे.

ऑफिडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई संघटना ही राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. क्रेडाई संघटना देशातील १३०० पेक्षा जास्त रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना आहे. देशात वाढत्या कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीने आणि कोरोना परिस्थिवर नियंत्रण आणण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्ध पटोडिया यांनी बांधकाम क्षेत्रातील २.५ कोटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली आहे. २.५ कोटी कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्यात येणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेला हातभार लागणार आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव जलदगतीने होताना दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रामाणावर कोरोना लसीकरण केले जात आहे. देशात २४ तासांत ३००हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत देशात ५३ हजार ४८० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ हजार २८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधिताची संख्या १ कोटी २१ लाख ४९ हजार ३३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४६८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १४ लाख ३४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५ लाख ५२ हजार ५६६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत ६ कोटी ३० लाख ५४ हजार ३५३ जणांचे लसीकरण पार पडले आहे. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -