घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटघ्या, Corona मुळे जपानमध्ये Credit Card ची टंचाई! १६ अंकी क्रमांक संपले!

घ्या, Corona मुळे जपानमध्ये Credit Card ची टंचाई! १६ अंकी क्रमांक संपले!

Subscribe

हल्ली सगळीकडे कोरोनाचा फैलाव, वाढत असलेले रुग्ण, कोरोनाची लस यायला होत असलेला उशीर आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या यांचीच चर्चा सुरू आहे. पण जपानमध्ये मात्र कोरोनामुळे एक भलतीच समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च येणार असून त्यामुळे सगळ्यांसमोरच पेच निर्माण झाला आहे. कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारांमध्ये (Online Shopping) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरेदी केल्यानंतर त्याचं कॅश पेमेंट करताना होणारा संपर्क टाळण्यासाठी बहुतेक ठिकाणी आता कार्ड किंवा मोबाईल पेमेंट केलं जात आहे. त्यातही आर्थिक अडचण वाढल्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे साहजिकच क्रेडिट कार्डची मागणीही वाढली आहे. आणि हीच जपानची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कारण इतके क्रेडिट कार्ड वाटून झालेत की आता त्यावर छापून येणारे १६ अंकांचे युनिक क्रमांकच संपले आहेत! द गार्डियनने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

जपानमध्ये आजघडीला किमान २८० क्रेडिट कार्ड कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून ग्राहकांना क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत या कंपन्यांचं मस्त चाललं होतं. पण वर्षाच्या सुरुवातीला कोरोनानं हजेरी लावली आणि इतर सर्वसामान्यांप्रमाणेच या कंपन्यांचंही गणित बिघडलं. आपण वापरत असलेल्या क्रेडिट कार्ड्सवर १६ अंकांचा युनिक क्रमांक असतो. त्यावरून प्रत्येक कार्ड आणि त्याची माहिती वेगवेगळी ठरते. पण इथेच गोंधळ झाला आहे.

- Advertisement -

क्रेडिट कार्डवरच्या १६ अंकी क्रमांकाचा अर्थ काय?

आपल्या क्रेडिट कार्डवर असणाऱ्या १६ अंकी युनिक क्रमांकामध्ये आपली, बँकेची, कंपनीची, देशाची अशी माहिती साठवलेली असते. कार्डावरच्या पहिल्या ६ क्रमांकांमध्ये संबंधित देश, सेवा पुरवणारा ब्रॅण्ड आणि इतर माहिती असते. तर पुढच्या १० क्रमांकांमध्ये संबंधित व्यक्तीचा अकाऊंट नंबर, खात्याचा प्रकार, क्रेडिट कार्ड कंपनीचा क्रमांक आदी माहिती साठवलेली असते. त्यामुळे कोणत्याही क्रेडिट कार्डसाठी हा १६ अंकांचा क्रमांक महत्त्वाचा असतो. हे क्रमांक विशिष्ट प्रकारची अंकजुळणी करून बनवण्यात आलेले असतात. त्यामुळे प्रत्येक क्रमांक हा दुसऱ्या क्रमांकापेक्षा वेगळा असतो. हे क्रमांक अशा पद्धतीने बनवले असतात जेणेकरून ते आंतरराष्ट्री फर्म असणाऱ्या Visa आणि Mastercard या कंपन्यांच्या प्रणालीशी ताळमेळ ठेऊ शकतील.

जपानमध्ये साधारणपणे दरवर्षी २ टक्क्यांनी क्रेडिट कार्डची मागणी वाढते. पण या वर्षी कोरोनामुळे मागणीनं प्रचंड उसळी घेतली आहे. त्यामुळे देशातल्या एकूण २८० कंपन्यांकडे असणारे अशा प्रकारचे १६ अंकी क्रमांक आता जवळपास संपत आले आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्डची मागणी अजून वाढली, तर या १६ अंकांमध्ये अजून एका अंकाची भर घालण्याचा पर्याय कंपन्यांकडे असेल. पण त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. शिवाय, आहे त्या कार्डांचे क्रमांकही १७ अंकी करायचे की नव्यानं १७ अंकी क्रमांक तयार करायचे, हाही एक मुद्दा ठरणार आहे. हे हजारो कोटी कंपन्यांनी स्वत:च्या खिशातून खर्च करायचे, की ग्राहकांकडून त्यांची वसुली करायची? हा देखील प्रश्न असून या पार्श्वभूमीवर लवकरच जपानमध्ये क्रेडिट कार्ड्सची टंचाई निर्माण होणार आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -