माझा पती फ्लॉप कसा? या भारतीय क्रिकेटपटूची पत्नी भडकली

मनोज तिवारीबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यात ११ फ्लॉप क्रिकेटपटू ठरलेल्या ११ खेळाडूंची नावे आहेत.

Cricketer Manoj Tiwari and wife
क्रिकेटपटूच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी

भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांची पत्नी सुष्मिता रॉय तिच्या क्रिकेटर नवऱ्यावर सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे भडकली आहे. सोशल मीडियावर स्क्रीन शॉट्स शेअर करुन तिने आपला रागही व्यक्त केला आहे. मनोज तिवारीबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यात ११ फ्लॉप क्रिकेटपटू ठरलेल्या ११ खेळाडूंची नावे आहेत. या पोस्टमध्ये तिचे पती मनोज तिवारी यांचे नाव पाहून सुष्मिता खूप चिडली आणि पोस्ट शेअर करून अशा प्रोफाइल तयार करण्याऱ्या विरोधात राग व्यक्त केला आहे. सुष्मिताने ती पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘असे अयोग्य प्रोफाइल कोणी तयार केले आहे, तुझी हिम्मत कशी झाली, माझ्या नवऱ्याचे नाव त्यात ओढण्याचे, अशी बकवास पोस्ट शेअर करण्यापूर्वी तुम्ही तुमची वस्तुस्थिती तपासावी’.

सुष्मिताच्या या पोस्टनंतर अनेक चाहतेही त्यांच्या समर्थनार्थ आले आहेत. तिवारी यांनी आतापर्यंत भारतासाठी १२ एकदिवसीय सामने आणि ३ टी -२० सामने खेळले आहेत. मनोज तिवारीने वनडेमध्ये शतक आणि अर्धशतक ठोकले आहे. तिवारी अशा दुर्दैवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांना प्रतिभा मिळाल्यानंतरही जास्त संधी मिळाल्या नाहीत.

मनोज तिवारी यांची पत्नी सुष्मिता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत. विशेषत: आपले फोटो शेअर करून त्या लोकांमध्ये बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी केकेआरने ट्वीट केल्याने तिवारी संतापले होते, २७ मे २०१२ रोजी केकेआरची टीम प्रथम आयपीएल विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाली होती.