घरदेश-विदेशक्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू शनिवारी येणार पटियाला कारागृहाच्या बाहेर

क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू शनिवारी येणार पटियाला कारागृहाच्या बाहेर

Subscribe

३४ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना मागील वर्षी मे महिन्यात एक वर्ष कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण आता उद्या शनिवारी सिद्धू हे कारागृहाच्या पटियाला कारागृहाच्या बाहेर येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांची उद्या शनिवारी पटियाला कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे. 34 वर्षांपूर्वी घडलेल्या ‘रोड रेज’ प्रकरणात सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, पण शिक्षा पूर्ण होण्याच्या 48 दिवस आधीच ते पटियाला तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत. याबाबतची माहिती नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अधिकृत ट्वीटर अकांउटवरून देण्यात आली आहे.

- Advertisement -

34 वर्षांपूर्वी म्हणजेच 1988 मध्ये घडलेल्या एका प्रकरणात नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने 20 मे 2022 रोजी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी सिद्धू यांनी या प्रकरणी स्वतः न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर सिद्धू यांना वैद्यकीय तपासणीसाठी माता कौशल्या रुग्णालयात नेण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांची थेट रवानगी ही पटियाला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. सिद्धू यांना 18 मे 2023ला तुरुंगातून सोडण्यात येणार होते, पण त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे 48 दिवस आधीच त्यांची सुटका करण्यात येणार आहे.

कोणत्या प्रकरणात नवज्योत सिद्धू यांना झाली होती शिक्षा?
27 डिसेंबर 1988 रोजी सिद्धूचा पटियाला येथील रहिवासी असलेले गुरनाम सिंग यांच्यासोबत पार्किंगच्या जागेवरून वाद झाला होता. त्यावेळी हा वाद इतका विकोपाला गेला की या वादामध्ये सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर सिंग संधू यांनी गुरनाम सिंग यांना त्यांच्या कारमधून बाहेर ओढले आणि मारहाण केली. यानंतर गुरनाम सिंगचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. गुरनाम सिंग यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणात सिद्धू यांची ट्रायल कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाकडून सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सिद्धू यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 15 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द देखील केला होता. तर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून सिद्धू यांना एक हजार रुपयांचा दंड सुद्घा ठोठावण्यात आला होता. परंतु मे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना सिद्धू यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.


हेही वाचा – ‘त्यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावे’; रोहित पवारांनी नरेश मस्केंना सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -