(Crime in Jabalpur) भोपाळ : कितीही सराईत गुन्हेगार असला तरी, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडतोच. यासाठी पोलीस कधी खबऱ्यांची मदत घेतात, कधी सीसीटीव्ही फूटेज तपासतात, तर कधी संशयितासाठी थर्ड डिग्रीचा वापर करतात. पण जबलपूर पोलिसांनी एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी एक नव्या फंड्याचा वापर केला. त्याला आमिष दाखवून गजाआड केले. (A thief was jailed after showing a lure of 10 thousand rupees)
लॉर्डगंज पोलीस ठाणे परिसरातील गेट क्रमांक 1जवळ असलेल्या एका कॉम्प्युटर सर्व्हिस सेंटरचे कुलूप तोडून एका चोराने सुमारे दोन लाख रुपयांची चोरी केली. ही घटना 2 जानेवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. दुकानातून सुमारे दीड लाख रुपये आणि एक महागडा मोबाईल फोन चोरीला गेला. दुकानातील कर्मचारी सूर्यनारायण मिश्रा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 1 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडले तेव्हा एल ड्रॉप (दाराची क़डी) कापलेले दिसले. तसेच, दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
हेही वाचा – Inhuman behavior : कोणावर विश्वास ठेवायचा? मदत मागितली त्यांनीच अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार…
या सर्व्हिस सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरीची घटना कैद झाली. फुटेजमध्ये चोरटा नोटांचे गठ्ठे चोरताना स्पष्टपणे दिसत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना वेगळा रणनीती आखली. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये ‘हरवला आहे’ असे लिहिलेले, या चोरट्याचा फोटो असलेले पोस्टर्स लावले. घरातून न सांगता निघून गेलेल्या या व्यक्तिची माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.
एका जागरूक नागरिकाने पोलिसांना फोन करून या ‘बेपत्ता’ व्यक्तीबद्दल माहिती दिली. त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत चोराला बेड्या ठोकल्या. मनीष यादव असे या चोरट्याचे नाव असून तो जबलपूरच्या कांचनपूर भागात राहतो. मनीषने आपल्या दोन साथीदारांसह ही चोरी केली होती. मोनी राजपूत आणि सरजू दुबे अशी त्या साथीदारांची नावे असून पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या तिघांकडून 1 लाख 18 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. (Crime in Jabalpur: A thief was jailed after showing a lure of 10 thousand rupees)
हेही वाचा – Delhi liquor policy : दिल्ली मद्य धोरणात सरकारला सुमारे 2 हजार कोटींचे नुकसान; कॅगच्या अहवालात उघड