Homeक्राइमCrime News : 12 वर्षीय मुलाकडून 16 वर्षीय मित्राची हत्या, धक्कादायक कारण...

Crime News : 12 वर्षीय मुलाकडून 16 वर्षीय मित्राची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

Subscribe

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कधी कुठे हत्या तर कधी कुठे मारहाण यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता एका 12 वर्षीय मुलाने त्याच्या 16 वर्षीय मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

मेरठ (उत्तर प्रदेश) : देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कधी कुठे हत्या तर कधी कुठे मारहाण यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता एका 12 वर्षीय मुलाने त्याच्या 16 वर्षीय मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घडली असून ज्या 16 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे, तो 11 वीत शिकत होता, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मेरठमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Crime News Murder of 16-year-old friend by 12-year-old boy in Meerut)

मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय आरोपी मुलाच्या मोबाइलमध्ये त्याचे मैत्रिणीसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ होते. परंतु, हेच फोटो आणि व्हिडीओ 11 वीत शिक्षण घेणाऱ्या त्याच्या 16 वर्षीय मित्राने आपल्या मोबाइलमध्ये न सांगता घेतले. ज्यानंतर याची माहिती आरोपी मुलास कळाजी, ज्यानंतर अल्पवयीने आरोपीने संतापात 16 वर्षीय मित्राच्या हत्येचा कट रचला. शनिवारी (ता. 28 डिसेंबर) हा हत्येचा संपूर्ण प्रकार उघड झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मृत मुलगा शनिवारी संध्याकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. याबाबत त्याच्या कोचिंग सेंटरमध्येही चौकशी करण्यात आली. पण काहीही तपास न लागल्यामुळे मृत मुलाच्या घरच्यांनी याबाबत पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा…. Suchir Balaji Death : भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीच्या मृत्यूप्रकरणी FBI चौकशीची मागणी, एलन मस्कने म्हटले…

पोलिसांनी कुटुंबीयांच्या सांगण्यावरून घटनेचा तपास सुरू केला असता, सदर मुलगा त्याच्या अल्पवयीन मित्रासोबत शेवटचा दिसला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीने आरोपीची चौकशी सुरू केली. सुरुवातीस या मुलाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पण काही वेळाने त्याने आपणच 16 वर्षीयम मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. अल्पवयीन आरोपीने सांगितले की, त्याने त्याच्या मित्राला त्याचा मोबाइल आठ हजार रुपयांना विकायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा मित्र याकरिता त्याला भेटायला गेला. ज्यानंतर अल्पवयीन आरोपी त्याला भवनपूर परिसरात एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्या दोघांनी सोबत आणलेले पदार्थ खाल्ले.

खाऊन झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीने संधी मिळताच आपल्या मित्राच्या डोक्यात हातोड्याने वार केले. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पण आरोपी तितक्यावरच थांबला नाही तर त्याने तिथे एका नदीच्या बाजूला मोठ्या खड्ड्यात मृतदेह पुरला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या 16 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे, तो मुलगा आयआयटीची तयारीही करत होता आणि तो आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता.


Edited By Poonam Khadtale