घरCORONA UPDATECoronaVirus: करोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे संकट - आयएमएफ

CoronaVirus: करोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे संकट – आयएमएफ

Subscribe

संपूर्ण जगावर करोना व्हायरस सावट आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे करोनासह संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे संकट घेऊन येणार असल्याचा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी असल्याचं सांगितल जात आहे. या आर्थिक संकटातून २०२१ मध्ये बाहेर पडू अशी आशा देखील आयएमएफने व्यक्त केली आहे.

करोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ८० पेक्षा जास्त देशांनी आयएमएफकडे मदत मागितली आहे. जे विकसित देश आहेत ते या आर्थित मंदीचा सामना करू शकतील. पण जे विकसनशील देश आहेत ते या आर्थिक मंदीचा सामना करू शकणार नाही या देशांना या संकटातून बाहेर पडणे फार कठीण असल्याच बोलल जात आहे.

- Advertisement -

आतापर्यंत जगभरातील करोनाग्रस्तांची ३ लाख ७९ हजार ३७५ वर पोहोचली आहे. तसंच या करोनामुळे १६ हजार ५०९ जण बळी पडले आहेत. मात्र एक दिलासा देणारी बाब म्हणजे करोनामुळे १ लाख ४८४ जण रिकव्हर झाले आहेत. तसंच आतापर्यंत देशात ४९९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून २४ करोना रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus – दुबईवरून आलेला ‘तो’ लपून बसलेला उरणच्या हॉटेलमध्ये

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -