राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खुलेआम क्रॉस व्होटिंग; काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीत धुसफूस

आसाममध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एआययूडीएफचे आमदार करीमुद्दीन बारभुईया यांनी केला आहे

presidential election result 2022 draupadi murmu or yashwant sinha who will be 15th president of india

देशातील 15 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज ( 18 जुलै 2022) मतदान झाले. मात्र या निवडणुकीतही क्रॉस व्होटिंगची घटना समोर आली आहे. यूपी, गुजरात, ओडिशा ते आसामपर्यंत क्रॉस व्होटिंग पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशातील बरेली येथील सपा आमदार शाहजील इस्लाम यांनी द्रौपदी मुर्मू यांना जाहीर मतदान केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे शाहजील इस्लाम चर्चेत आले होते. यानंतर त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली. दुसरीकडे गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओडिशा, आसाममध्ये काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंगचा दावा केला आहे.

क्रॉस व्होटिंग नेमके झाले कुठे?

उत्तर प्रदेशच्या बरेली मतदारसंघाचे शाहजील इस्लाम आमदार आहेत. शाहजील इस्लाम यांनी योगी यांच्यावर वक्तव्य केले होते, त्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या विविध मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. शाहजील इस्लाम यांच्या पेट्रोल पंपावरही प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. आझम खान यांनी सपा नेत्यांच्या पक्षाला भेटण्यास नकार दिल्याने शाहजील इस्लामही त्यांच्या समर्थनात दिसले.

यापूर्वी प्रसपा प्रमुख आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव म्हणाले की, विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी मुलायम सिंह यादव यांचे आयएसआय एजंट म्हणून वर्णन केले होते. आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही. मुलायम सिंह यांच्या विचारसरणीचे पालन करणारे सपाचे नेते असे आरोप करणाऱ्या नेत्याला कधीही मतदान करणार नाहीत, असा दावा त्यांनी केला होता. मात्र मतदान करण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यशवंत सिन्हा यांना मतदान करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : राष्ट्रपतीपद निवडणूक : विरोधकांमधील फुटीमुळे रालोआच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय सुकर

गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंग

गुजरातमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार कांधल एस जडेजा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे सांगितले आहे. दरम्यान ओडिशा काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम म्हणाले, ते काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र मी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, मी माझ्या आतला आवाज ऐकला, ज्याने मला माझ्या मातीसाठी काहीतरी करायला सांगितले. म्हणूनच मी द्रौपदी मुर्मू यांना मत दिले. मात्र ओडिशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष न केल्याने मुकीम नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूं यांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

आसाममध्येही क्रॉस व्होटिंग

आसाममध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एआययूडीएफचे आमदार करीमुद्दीन बारभुईया यांनी केला आहे. करीमुद्दीन यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने रविवारी बैठक बोलावली होती. यावेळी फक्त 2-3 आमदार उपस्थित होते. यात बैठकीला फक्त जिल्हाध्यक्ष अधिक होते. यावरून काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर काँग्रेसच्या 20 हून अधिक आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, यामुळे निकालात तुम्हाला संख्या कळेल, असा दावा त्यांनी केला.


हेही वाचा : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून जगदीप धनखर, विरोधकांकडून मार्गारेट अल्वांनी दाखल केला अर्ज