घरदेश-विदेशकावळ्याने स्वॅप केले क्रेडिट कार्ड, जपानमधील अजब घटना

कावळ्याने स्वॅप केले क्रेडिट कार्ड, जपानमधील अजब घटना

Subscribe

शहर, गाव या सारख्या मनुष्य वस्तीच्या जवळ हमखास आढळणारा पक्षी म्हणजे कावळा. कावळा हा चतुर असल्याच्या आपण लहामपणी गोष्टी ऐकल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात देखील कावळा तितकाच चतुर आणि हुशार असल्याचा प्रत्यय जपानमध्ये पाहण्यास मिळाला आहे. जपानमधील किशिको या रेल्वे स्थानकात चक्क कावळ्याने तिकीट विकत घेण्यासाठी कार्ड स्वॅप करण्याचा प्रयत्न केला आहे. तिकीट काढण्यासाठी कावळा क्रेडिट कार्ड मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांकरता तो लोकप्रिय देखील तितकाच ठरला आहे.

किशिको या रेल्वे स्थानकात एक महिला तिकीट काढण्यासाठी रांगेत उभी असते. त्याच दरम्यान कावळा त्या ठिकाणी येतो. अचानक कावळा आलेला पाहून मागे उभा राहिलेला मनुष्य मागे होतो. हा कावळा त्या महिलेल्या हातातील क्रेडिट कार्ड हिसकावून ते दुसऱ्या मशीनमध्ये स्वॅप करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्या अथक प्रयत्नाने देखील त्याला ते कार्ड स्वॅप करता येत नाही. अखेर तो क्रेडिट कार्ड तिथेच टाकतो आणि त्या जागेवर बसून राहतो. असा हा मजेशीर व्हिडिओ सध्या अधिक प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -