घरदेश-विदेशक्राऊन प्रिन्स सलमान बिन अब्दुल अजीज सौदी अरेबियाचे नवे पंतप्रधान

क्राऊन प्रिन्स सलमान बिन अब्दुल अजीज सौदी अरेबियाचे नवे पंतप्रधान

Subscribe

नवी दिल्ली सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांनी त्यांचे उत्तराधिकारी असणारे ज्येष्ठ राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या हाती पंतप्रधान पदाची धुरा दिली आहे. तर छोटा मुलगा खालिद याला देशाच्या संरक्षण मंत्रीपद दिलं आहे. यासह सौदीच्या राजाने इतर दोन मंत्र्यांची घोषणा केली असून प्रिंस तुर्की बिन मोहम्मद बिन फहद बिन अब्दुल अजीज यांना राज्य मंत्री आणि प्रिंस अब्दुल अजीज बिन तुर्की बिन फैसल यांना क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे यापूर्वी संरक्षण मंत्री होते मात्र किंग सलमान यांच्या प्रकृतीमुळे त्यांना पंतप्रधानपद बहाल करण्यात आलं. यासह सलमान हे सौदीचे गेल्या अनेक वर्षापासून अघोषित असे राज्यकर्ते आहेत.

- Advertisement -

सौदी अरेबियाचे राजे सलमान हे 86 वर्षीय असून त्यांच्या राजकीय कारकीर्दविषयी सांगायचे झाल्यास 2015 मध्ये ते शासक बनले मात्र यापूर्वी राजे सलमान यांनी प्रिन्स सलमानप्रमाणेच तब्बल अडीच वर्षे क्राऊन प्रिन्स म्हणूनच कारभार पाहीला. गेल्या काही काळापासून किंग सलमान यांचे स्वास्थ खालावत चालले आहे. यामुळे सौदी अरेबियाचे पंतप्रदान क्राऊन प्रिन्स हेच होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही काळात किंग सलमान यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासह मे महिन्यात कोलोनोस्कोपीसह अनेक चाचण्या करण्यात आल्या

किंग सलमान यांनी 2015 मध्ये राजकारणात प्रवेश केला यावेळे त्यांनी 2030 सालचे व्हिजन तयार केले होते. सौदीला अरब आणि इस्लामिक देशाची सर्वाधीक मोठी ताकद बनवणे हा त्यांचा राजकीय उद्धेश होता. त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मात्र एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.


केरळच्या मॉलमधील अभिनेत्रीच्या विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल; होणार पोलीस चौकशी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -