घरताज्या घडामोडीपुलवामात आयईडी बॉम्ब हल्ला, एक जवान जखमी

पुलवामात आयईडी बॉम्ब हल्ला, एक जवान जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील गूंग भागातील केंद्रीय राखीव पोलिस दलावर (सीआरपीएफ) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर येत आहे. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकाचा वापर करून सीआरपीएफच्या दलावर हल्ला केला. आयईडी स्फोटकाच्या ब्लास्ट नंतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफ दलावर गोळीबार सुरू केला. यादरम्यान एक जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. या हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसर घेरला असून या भागात शोध मोहीम सुरू आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, सकाळी ७.४० मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तैनात असलेल्या दलावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी रस्त्याच्या कडेला स्फोटके ठेवली आहे. यामध्ये सीआरपीफच्या १८२ बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे.

या हल्ल्यानंतर उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यामुळे सध्या या संपूर्ण परिसर लष्कराने घेराला असून शोध मोहीम सुरू आहे.

- Advertisement -

यापूर्वी २६ जूनला सीआरपीएफच्या दलावर हल्ला केला होता. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहारातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – चीनला इशारा! LAC वर हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे एअर ऑपरेशन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -