रशिया-यूक्रेन तणाव; ७ वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर पार; २०१४ नंतर उच्चांकी वाढ

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे तेल कंपन्यांचे मोठे नुकसान

crude Oil surges to 7-year high above 90 dollar per barrel as Russia-Ukraine tensions rise

सध्या रशिया आणि यूक्रेनमधील तणाव हा वाढतानाच दिसत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर सात वर्षांत पहिल्यांदा ९० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. २०१४नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर या स्तरावर गेले आहेत. पण जर रशिया आणि यूक्रेनमधील तणाव कायम राहिला तर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडू शकतात, अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

कच्च्या तेलाचे दर वाढत असले तरीही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलची दर ८३व्या दिवशी स्थिर आहेत. दरम्यान रशिया जगातील दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा तेल उत्पादक आहे. त्यामुळे युरोपचा ऊर्जा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनचा प्रभाव कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.

तसचे काही तज्ज्ञांच्या मते, जर रशिया आणि यूक्रेनमधील तणाव कायम राहिला तर कच्च्या तेलाचे दर गगनाला पोहोचतील. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात यांची किंमत १२५ डॉलर प्रति बॅरल होवू शकते.

..यामुळे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

देशात पाच राज्य उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहेत. अशात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करून सरकार मतदारांना नाराज करू इच्छित नाहीत. पण विधानसभा निवडणुकीनंतर सरकार ग्राहकांना मोठा झटका देऊ शकते. पण दुसरीकडे देशांतर्गत दर न वाढल्याने तेल कंपन्यांचे नुकसान होत आहे.

रशिया आणि यूक्रेनमध्ये काय आहे वाद?

यूक्रेन एक सोव्हिएत देश आहे. २०१४ मध्ये रशियाने एक मोठे पाऊल उचलत यूक्रेनचा भाग असलेल्या क्रीमियावर कब्जा केला होता. ज्यानंतर यूक्रेनच्या सैन्यात आणि रशिया समर्थित फुटीरतावाद्यांमध्ये लढाई झाली. असे म्हटले जाते की, या लढाईमध्ये १४ हजारांहून अधिक लोकं मारले गेले होते. तर २० लाख लोकांना आपले घर सोडावे लागले होते. गेल्यावर्षी अचानक रशियाने यूक्रेनच्या सीमेवर सैनिकांचा फौजफाटा वाढवला होता. ज्यानंतर अमेरिका आणि यूक्रेनने दोघांनी दावा केला की, रशिया या देशावर हल्ला करू शकते. यामुळे ते सीमेवर सैनिकांचा फौजफाटा वाढवत आहे. अमेरिका आणि युरोपने इशारा दिला आहे की, ‘जर रशियाने या देशावर हल्ला किंवा कब्जा केला, तर रशियावर कडक निर्बंध लावले जातील.’


हेही वाचा – Ukraine Crisis : रशिया युक्रेनवर आक्रमण का करु शकतो? अमेरिकेची भूमिका काय?