घरताज्या घडामोडीVideo Viral: 'भारत सीमेवर जाताना चीनी सैनिकांना भीती वाटते, रडूही कोसळतं'

Video Viral: ‘भारत सीमेवर जाताना चीनी सैनिकांना भीती वाटते, रडूही कोसळतं’

Subscribe

भारत आणि चीन दरम्यान लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारत सीमेवर जाण्यासाठी चीनी सैनिक निघाले असून ते प्रचंड घाबरून रडताना दिसत आहेत. भारत-चीन सीमेवर ड्युटी लागताच चीनी सैनिकांना रडू कोसळतं, अशा आशयाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय सीमेवर पोस्टिंगसाठी जाणाऱ्या सैनिकांचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या व्हिडिओमागे काही वेगळेच कारण असल्याचे आता समोर आले आहे.

तैवान न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ सर्वात आधी चीनी सोशल मीडिया व्हि चॅट (WeChat) वर अपलोड करण्यात आला होता. मात्र नंतर तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला. हा व्हिडिओ फुयांग रेल्वे स्टेशनला जात असताना शूट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनी सेनेत भरती झालेल्या नव्या सैनिकांना ट्रेनिंगनंतर भारतीय सीमेवर तैनात करण्यासाठी नेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

या व्हिडिओत चीनी सैनिक रडताना दिसत आहेत. सोबत ते चीनी सेनेचे PLA (People’s Liberation Army) चे गीत “ग्रीन फ्लॉवर्स इन द आर्मी” हे गाणे गाताना दिसत आहेत. तैवान न्यूजने सांगितले की, हा व्हिडिओ सर्वात आधी फुयांग सिटी वीकली (Fuyang City Weekly) च्या WeChat पेजवर पोस्ट केला होता. मात्र नंतर बदनामीच्या भीतीने तो डिलीट मारण्यात आला.

पाकिस्तानी कॉमेडियननेही उडवली थट्टा

पाकिस्तानी कॉमेडियन जैद हामिद याने देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन चीनची थट्टा उडवली आहे. हामिदने लिहिले की, चीनच्या सैनिकांना लहान मुलाप्रमाणे रडताना पाहून आमच्या चीनी बांधवांची प्रेरणा गंभीर स्वरुपात प्रभावित झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -