घरदेश-विदेशClimate Change : यंदाच्या वर्षी भारताने केला सर्वाधिक खराब हवामानाचा सामना

Climate Change : यंदाच्या वर्षी भारताने केला सर्वाधिक खराब हवामानाचा सामना

Subscribe
Climate Change : सध्या हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाढा, वाढता पारा, पूर, वादळ यांसारथ्या तीव्र हवामानाच्या घटना वाढत आहेत. याच दरम्यान, CSE च्या नुकत्याच आलेल्या अहवालात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतातील सुमारे 86 टक्के दिवस सामान्य हवामानापेक्षा कमी नोंदवले गेले आहेत. या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आले आहे की अशा घटानांचा सर्वाधिक फटका बिहारला बसला आहे. येथे सर्वात जास्त मानवी मृत्यूची नोंद झाली आहे.
विज्ञान आणि पर्यावरण केंद्र Centre for Science and Environment (CSE) ने जारी केलेल्या एक्सट्रीम वेदर रिपोर्ट 2023 मध्ये म्हटले आहे की, या वर्षी 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत 273 पैकी 176 दिवसांमध्ये भारताने अत्यंत खराब वातारणाची नोंद करण्यात आली आहे. या आपत्तींमुळे वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत 2,923 लोकांचं मृत्यू झालं आहे. त्याचप्रमाणे 2 दशलक्ष हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. याच अपत्तींमुळे 80 हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत तर 92,000 जनावरांनाही आपला जीव गमवाना लागला आहे.
CSE च्या रिपोर्ट नुसार खराब वातावरणामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज वास्तवापेक्षा कमी असेल. कारण प्रत्येक घटनेची माहिती संकलित केला जात नाही, कारण प्रत्येक घटनेची माहिती संकलित केली जात नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा पीक नुकसानीची गणना केली जात नाही.
अहवालानुसार, मध्य प्रदेशमध्ये खराब वातावरणामुळे 138 घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे बिहारमध्ये 642 मृत्यू झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशात 365 आणि उत्तर प्रदेशात 341 मृत्यूची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त पूर सारख्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशात सर्वाधिक घरे उद्ध्वस्त झाली. तर पंजाबमध्ये सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये 67 दिवसांच्या खराब वातावरणामुळे सर्वात जास्त घटनांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक मृत्यू(60) झाले. तेलंगणामधील 62 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झाले आहे. एवढचं नाही तर राज्यात 645 जनावरही प्रभावित झाली आहेत. कर्नाटकला देखील भयंकर विनाशाचा सामना करावा लागला. ज्यामध्ये 11 हजारांहून अधिक घरे उद्ध्दस्त झाली आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 113 दिवस खराब वातावरणाचे होते. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राज्यस्थानलाही याचा मोठा फटका बसला आहे. त्याच बरोबर आसाममध्ये खराब वातारणामुळे 102 घटनांची नोंद झाली ज्यामध्ये राज्याने 159 प्राणी गमावले आणि 48,000 हेक्टरपेक्षा जास्त पिके नष्ट झाली. नागालँडमध्ये 1,900 पेक्षा अधिक घरे उद्ध्दस्त झाली.
यावर्षी जानेवारी महिन्यात सरासरीपेक्षा किंचित गरम होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये गेल्या 122 वर्षातील विक्रम मोडला आहे. आणि 122 वर्षांमध्ये हा सहावा कोरडा महिना होता. फेब्रुवारी व्यतिरिक्त, ऑगस्ट महिना देखील सर्वात कोरडा होता. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) ने भारतीय हवामान विभागाकडून गोळा केलेल्या आकडेवारीच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -