स्वदेशी RT-PCR किट ‘ओम’ करणार आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचे डिटेक्शन

हे किट फेब्रुवारीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल

CSIR CDRI scientists develop OM the RT-PCR kit for Omicron
स्वदेशी RT-PCR किट 'ओम' करणार आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचे डिटेक्शन

भारतासह जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र या व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी काही मोजकेच आरटीपीसीआर किट सध्या उपलब्ध आहेत. अशातच CSIR-CDRI ने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी एक स्वदेशी RT-PCR किट तयार केले आहे. ‘OM’ असे या आरटीपीसीआर किटचे नाव असून हे किट फेब्रुवारीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल. आत्तापर्यंतचे सर्वात स्वस्त RT-PCR चाचणी किटपैकी हे एक किट असेल.

CSIR-CDRI टे संचालक प्रा. तपस. के. कुंडू यांनी सांगितले की, कोरोनाच्या जस- जश्या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर येत आहे. तस-तसं त्या व्हेरिएंटवर उपचार करणे आव्हानात्मक होत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक नाही परंतु हा एक सुपर स्प्रेडर व्हेरिएंट आहे. परंतु या व्हेरिएंटची पूर्ण माहिती घेत येत नाही. कुंडू यांनी सांगितले की, आत्तापर्यंतच्या आरटी-पीसीआर आधारित डायग्नोस्टिक किटमधून ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या म्युटेशनमुळे कोरोना संक्रमण वाढत असल्याची कोणतीही माहिती नाही.

जगभरातील मोजक्या किट्सपैकी एक

सीएसआईआर-सीडीआरआय, लखनऊचे शास्त्रज्ञ डॉ. अतुल गोयल, डॉ. नीति आणि डॉ. आशिष अरोडा यांच्या टीमने बायोटेक सरकार हैदराबादसह मिळून ओमिक्रॉन व्हेरिएंटला ओळखू शकणाऱ्या स्वदेशी आरटीपीसीआर किट इंडिकोव- ओम विकसित केले आहे. जगभरात उपलब्ध असणाऱ्या किटपैकी हे एक किट आहे.

यावर टीम लीडर डॉ. अतुल गोयल म्हणाले की, ओमिक्रॉनबाधित रुग्णाच्या नमुन्यांची प्रत्यक्ष ओळख करणारे हे स्वदेशी डायग्नोस्टिक किट विकसित करण्यात आले आहे. या प्रायमरी किटच्या माध्यमातून जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अमिता जैन यांनी पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुनांचे परीक्षण केले आहे.

फेब्रुवारीपर्यंत बाजारात होईल उपलब्ध

प्रो. कुंडू यांनी माहिती दिली की,Omicron चा शोध घेणाऱ्या या डायग्नोस्टिक किटला चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे पाठवण्यात आले आहे. हे किट जीनोम सिक्वेन्सिंगच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे जलद आणि किफायतशीर स्क्रीनिंग प्रदान करेल. कोरोना संसर्गासह इतर श्वसनासंबंधीतील संक्रमणदेखील याद्वारे शोधले जाऊ शकतात. इंडिकोव्ह-ओम नावाने हे किट फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बाजारात उपलब्ध होईल.


बॉलीवूडकरांपासून सावध राहा, कंगनाचा साऊथ स्टार्सला इशारा