घरदेश-विदेशटिपू सुलतान विरुद्ध सावरकर, चौकाला नाव देण्यावरुन वादंग; कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात संचारबंदी...

टिपू सुलतान विरुद्ध सावरकर, चौकाला नाव देण्यावरुन वादंग; कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू

Subscribe

कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यात एका चौकाला नाव देण्यावरून वादाला सुरूवात झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आला आहे. तर सोबतच मोठा पोलीस बंदोबस्त देखील घटनास्थळी ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यात एका चौकाला नाव देण्यावरून वादाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील जिल्हा प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आला आहे. एका चौकाला टिपू सुलतान याचे नाव दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन आणि निदर्शन करण्याचा इशारा दिला, यानंतर या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिणामी आता या जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, या भागातील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस आयुक्त शालूम हुसैन यांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे. सोबतच मोठा पोलीस बंदोबस्तही घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

- Advertisement -

एका चौकाला टिपू सुलतान हे नाव दिल्याने या बेकायदेशीर नामांतराला विरोध करणार असल्याचा इशारा जय छत्रपती शिवाजी सेना या हिंदू संघटनेकडून देण्यात आला होता. या चौकाचे नाव न बदलल्यास 27 फेब्रुवारीला गांधी चौकातून आंदोलन सुरू करणार असल्याचेही या संघटनेकडून सांगण्यात आले होते. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नामफलक साफ करावा, असे या संघटनेचे म्हणणे होते.

या संघटनेने दावा केला होता की, टिपू सुलतानच्या नावावरून मंडळाचे नाव बदलणे हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे आणि शहराच्या अधिकाऱ्यांनी ते बदलण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. हत्तीकुनी रोड येथील जंक्शनचे नाव 1996 मध्ये मोहम्मद अब्दुल कलाम आझाद चौक असे ठेवण्यात आले होते, परंतु 2010 मध्ये नागरी संस्थेने सर्वानुमते टीपू सुलतान चौक असे नाव ठेवले होते. नुकतेच तेथे टिपू सुलतानचे पोस्टर आणि ध्वजही लावण्यात आला आहे. ज्यामुळे हिंदू संघटनांनी आक्रमक होऊन हा इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – भूमीअभिलेखचा पुन्हा एक लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात आनंदात साजरा केला जात असताना याच मुद्द्यावरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी अमीर अहमद सर्कल येथे वीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र टिपू सुलतान समर्थकांनी टिपू सुलतानचा बॅनर लावण्यासाठी वीर सावरकर यांचा बॅनर हटविण्याचा प्रयत्न झाला. हिंदू समर्थक कार्यकर्त्यांनी सावरकरांचा बॅनर हटविण्याच्या प्रयत्नांविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर दोन्ही गटात वाद होऊन हाणामारीला सुरुवात झाली. त्यात एक जण जखमी झाला. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना तिथे सौम्य लाठीमारही करावा लागला. त्यानंतर काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -