घरदेश-विदेशधक्कादायक! भारतीय सैन्यावर सायबर हल्ला

धक्कादायक! भारतीय सैन्यावर सायबर हल्ला

Subscribe

भारतीय सैन्यदालाचा जगात चौथा क्रमांक लागतो. देशात अतिरेक्यांना सहजासहज घुसखोरी करता येत नाही आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्य तोडीस तोड उत्तर देते. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांकडून अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता या दहशतवाद्यांनी हॅकर्सच्या माध्यमातून भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा काही हॅकर्सने भारतीय सैन्यावर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्यदलाला या बाबत लगेच माहिती मिळताच सैन्यदल सावध झाले आणि शुक्रवारी लगेच ईमेल संदर्भात महत्त्वाच्या सूचना तिन्ही दलाला देण्यात आल्या.

चीन आणि पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याचा संशय

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तान आणि चीनकडून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ला हॅकर्सकडून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आला. मात्र, या घटनेबद्दल सैन्यदल तातडीने सतर्क झाले. सैन्यदलाने आपत्कालीन स्थिती घोषित केली आणि नोटीस असे शिर्षक असलेला मेल उघडू नये, अशी सूचना जारी केली.

- Advertisement -

जवानांना ‘ही’ सूचना देण्यात आली

भारतीय सैन्य दलातील जवानांना prvinayak.598k@goin या ईमेल आयडीवरुन मेल पाठवण्यात येत आहे. एक्सएलएक्स या हायपरलिंकसोबत फिशिंग मेल पाठवला जात आहे. या मेलचे शिर्षक नोटीस असे असेल, इनबॉक्समध्ये हा मेल आल्यास तो उघडू नये. अशाप्रकारचे मेल आल्यास सावध रहा, त्याची तक्रार आणि तो लगेच डिलीट करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -