घरक्राइमCyber Attack : भारतीय हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; हॅकर्सची पद्धत समजली

Cyber Attack : भारतीय हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; हॅकर्सची पद्धत समजली

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय हवाई हलाची संगणक प्रणाली अज्ञात सायबर हल्लेखोरांकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. हवाई दलाचा संवेदनशील डेटा चोरण्याचा हॅकर्सचा उद्देश होता, पण हे होऊ शकले नाही. हॅकर्स कोण होते हे कळू शकलेले नाही. पण भारतीय हवाई दलाचा डेटा सुरक्षित असून हॅकर्सच्या कामाची पद्धत समजली आहे. (Cyber Attack Attempted cyber attack on Indian Air Force Understand the method of hackers)

गुगलच्या प्रोग्रॅमिंग भाषेच्या मदतीने तयार केलेल्या ओपन सोर्स मालवेअरने हॅकर्सनी हा सायबर हल्ला भारतीय हवाई दलावर केला होता. मात्र, त्यांना हवाई दलाची महत्त्वाची माहिती चोरता आली नाही. तसेच हवाई दलातील कोणताही डेटा गहाळ झाला नाही. सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. यात 17 जानेवारी 2024 रोजी गो स्टीलर मालवेअरचा एक प्रकार आढळून आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना सरकारी सुरक्षा; सशस्त्र पोलीस 24 तास तैनात

गो स्टीलर हा मालवेअर GitHub वर सार्वजनिकरीत्या उपलब्ध होता. या मालवेअरच्या मदतीने भारतीय हवाई दलाच्या संगणकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण हा प्रयत्न नेमका कधी झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवाई दलाचा कोणताही डेटा चोरीला गेला नाही. मालवेअरद्वारे झालेला हल्ला निरुपयोगी ठरला आहे. हवाई दलाकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि फायरवॉल यंत्रणा आहे, ज्यामुळे डेटा चोरीला आळा बसला आहे.

- Advertisement -

मालवेअर हल्ला हवाई दलावर कसा झाला?

सायबर हल्लेखोर Su-30 MKI मल्टीरोल फायटर जेट खरेदीच्या नावाखाली भारतीय हवाई दलाच्या जवानांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, हॅकर्सनी 12 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हवाई दलाच्या आदेशाचा वापर करून रिमोट-नियंत्रित ट्रोजन हल्ल्याची योजना आखली होती. त्यांनी Su-30_Aircraft Procurement नावाची ZIP फाइल तयार केली. यानंतर हवाई दलाच्या संगणकांवर पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा – Uddhav Thackeray : भाजपा ‘चारसौ पार’ कशी जाते, तेच बघतो; ठाकरेंचं खुलं आव्हान

मालवेअर कशापद्धतीने काम करते?

मालवेअर क्लाउड स्टोरेज प्रदाता ओशी प्लॅटफॉर्मवर होस्ट केले होते. हे फिशिंग ईमेलद्वारे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते. संगणक वापरकर्ता किंवा ईमेल उघडणारी व्यक्ती ही संक्रमित झिप फाइल डाउनलोड केल्यानंतर त्यामागे लपलेला मालवेअर प्रोगाम म्हणजेच ISO फाइल सेव्ह होते. त्यानंतर ISO फाइल कोणालाही काही न समजता संगणाकात लोड होत राहते. संगणाकावर ISO फाइल लोड झाल्यानंतर .Ink फाइलमध्ये रुपांतरीत होते. यानंतर चोरणारा मालवेअर संगणकात पसरत जातो. ISO फाइलमध्ये CD, DVD, Blue Ray मधील ऑप्टिकल डिस्कची अचूक प्रत असते. त्यामुळे संगणकात उपस्थित असलेल्या डेटाची पटकन कॉपी करून चोरी करता येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -