Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिल्लीतील एम्स रुग्णालयावर झाला सायबर हल्ला; महत्वाची माहिती धोक्यात

दिल्लीतील एम्स रुग्णालयावर झाला सायबर हल्ला; महत्वाची माहिती धोक्यात

Subscribe

देशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय म्हणून दिल्लीतील एम्सची ओळख आहे.

एम्स प्रशासनाने सांगितले की त्यांच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाला आहे. रिपोर्ट देण्यासारख्या इतर अनेक कामांवर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान आईटी विभागाकडून पूर्ण माहिती मिळाल्या नंतर या संदर्भांत आणखी बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, त्या दिशेने काम सुद्धा सुरू आहे. (aiims government hospital – delhi)

एएनआई वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील एम्सचे सर्व्हर बुधवारी सकाळपासूनच डाऊन होते. त्यामुळे ओपीडी आणि इतर विभागातील महत्वाची कामे, नोंदी या हाताने केल्या जात आहेत. या सगळ्याचा त्रास तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. या सगळ्यात रुग्णांची ओढाताण होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – BMC Election 2023 : आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

सर्व्हर मध्ये आहे महत्वाची माहिती
एम्स मधील सर्व्हर हा बुधवारी सकाळ पासूनच डाऊन होता. दरम्यान त्या सर्व्हरमध्ये अत्यंत महत्वाची माहिती आहे. यामध्ये अनेकांचे मेडिकल रेकॉर्ड आहेत. त्यामुळे सायबर अटॅक करणाऱ्यांना ही सगळी माहिती मिळण्याचा धोका आहे. यामध्ये देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या सोबतच सर्व दलांच्या प्रमुखांची माहिती आहे.

- Advertisement -

देशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय म्हणून दिल्लीतील एम्सची ओळख आहे. या सरकारी रुग्णालयात देशभरातून लाखो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. नेहमी प्रमाणेच आज सुद्धा या रुग्णालयात मोठ्या प्रमाणवर रुग्णांची गर्दी होती. पण आज सकाळ पासूनच सर्व्हर डाऊन असल्या कारणाने लांबून आलेल्या रुग्णांची सुद्धा गैरसोय झाली.

हे ही वाचा – विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ प्रकरणी भावना गवळी आक्रमक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -