घरदेश-विदेशCorona Pandemic : कोरोना महामारी दरम्यान सायबर हल्ल्यांमध्ये २ हजार टक्क्यांनी झाली...

Corona Pandemic : कोरोना महामारी दरम्यान सायबर हल्ल्यांमध्ये २ हजार टक्क्यांनी झाली वाढ

Subscribe

इंटरनेटच्या वापरात वाढ होत असतानाच सायबर गुन्ह्यांशी संबधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. कोरोना महामारीदरम्यान, देशातील वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित सायबर सिक्युरिटीवरील एका कार्यक्रमात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात भारतामध्ये दोन हजार टक्के वाढ झाली आहे. भारताच्या पहिल्या सायबर सिक्युरिटी को-ऑर्डिनेटर गुलशन राय यांनी या संदर्भात असे सांगितले की, कोरोना महामारी दरम्यान सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून पुन्हा एकदा सायबर हल्ल्याला सुरूवात झाली आहे.

यासह ९० टक्के सायबर हल्ले जुन्या पद्धतीने केले जात आहेत. ज्यामध्ये फिशिंग, मेलवेअरचा समावेश आहे. तसेच सायबर हल्ले देखील अधिक होऊ लागले आहेत, ज्यांची संख्या आता नऊ टक्क्यांनी वाढली आहे. असे हल्ले देश आणि कोणत्याही संस्थेसाठी हानिकारक असल्याचे राय यांनी सांगितले. भारतात असणाऱ्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सायबर सुरक्षेवर हल्ला होत असल्याचे समोर येत आहे. कारण हे सर्व क्षेत्र परस्परांशी जोडले गेले आहेत. महामारीच्या काळात याच हल्ल्यांची संख्या दोन हजार टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे घरातील वापरले जाणारे आउटगोइंग एएसएल, डीएसएल , फायबर. यापैकी काहीही सुरक्षित नसल्याने संवेदनशील माहितीचा धोका आहे आणि याचा उपयोग वेगवेगळ्या हेतूंसाठी केला जात आहे, यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे राय यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी गृह मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार यांनी असे सांगितले की, महामारीच्या काळात गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलला ऑगस्ट २०१९ मध्ये लाँच करण्यात आले होते. आर्थिक फसवणूकीशी संबंधित जवळपास ५० टक्क्यांसह चार लाखांहून अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.


निर्बंध हटवावेच लागतील

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -