घरताज्या घडामोडीAsani Cyclone : 'असनी' चक्रीवादळाच्या मार्गात बदल; IMDकडून 'या' भागांसाठी रेड अलर्टचा...

Asani Cyclone : ‘असनी’ चक्रीवादळाच्या मार्गात बदल; IMDकडून ‘या’ भागांसाठी रेड अलर्टचा इशारा

Subscribe

बंगालच्या उपसागरात रविवारी संध्याकाळी असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे. असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे. बंगालच्या उपसागरावर 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे.

बंगालच्या उपसागरात रविवारी संध्याकाळी असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं आहे. असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे. बंगालच्या उपसागरावर ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असून, सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

‘असनी’च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘असनी’ हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेय-पूर्वेला सुमारे 330 किमी अंतरावर असल्यानं मंगळवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ असनी उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

चक्रीवादळ ‘असनी’ ने आपला मार्ग बदलला आहे, या चक्रीवादळाला सामना देण्यासाठी अनेक राज्यांचे हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सक्रियपणे काम करत आहेत. पूर्व किनारपट्टीजवळ आल्यानंतर वादळ पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे वादळ पूर्व किनार्‍याकडे सरकत असून, त्यामुळे बाधित भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून पाऊसही पडताना दिसत आहे.

सोमवारी हे वादळ विशाखापट्टणमपासून 550 किमी दक्षिण-पूर्व, पुरीच्या दक्षिणेस 680 किमी होते. ते 100 ते 110 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लगतच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत मच्छीमारांनी पुढील किमान दोन दिवस या भागात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी असनी वादळ काकीनाडा किंवा विशाखापट्टणमजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचू शकते. विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस राजली या नौदल हवाई स्थानकांवर बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण, तसेच गरज पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. चक्रीवादळाशी सामना देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, कृष्णा, गुंटूर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास ते 60 किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – औरंगाबादच्या लेबर कॉलनीत 338 घरं पाडण्याचं काम सुरु; स्थानिकांचा प्रचंड विरोध

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -