घरताज्या घडामोडीCyclone Tauktae Update: गुजरात किनारपट्टीला १८ मे रोजी धडकणार शक्तीशाली तोक्ते चक्रीवादळ

Cyclone Tauktae Update: गुजरात किनारपट्टीला १८ मे रोजी धडकणार शक्तीशाली तोक्ते चक्रीवादळ

Subscribe

एनडीआरएफच्या (NDRF) पाच टीम पुण्याहून गुजरातच्या दिशेने रवाना

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेले तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हीसीद्वारे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी आणि दमन आणि दीव, दादरा नगरा हवेलीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तोक्ते चक्रीवादळासंदर्भातील तयारीची चर्चा करण्यात आली. सध्या या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. हळूहळू चक्रीवाद महाराष्ट्राच्या दिशेने येत असून १८ मेला सकाळी गुजरात किनारपट्टीला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील किनारपट्टीला १८ मेच्या सकाळी तोक्ते चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील किनारपट्टीलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये १५० ते १६० किमी वेगाने वारे वाहू शकतात.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या (NDRF) पाच टीम पुण्याहून गुजरातच्या दिशेने रवाना झाल्या आहे. तसेच एनडीआरएफच्या ७९ टीम तैनात केले असून २२ अतिरिक्त पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. सैन्य, नौदल आणि तटरक्षक दलाचे जहाज आणि विमानवाहू जहाजांची बचाव आणि मदत दल तैनात करण्यात आले आहेत. माहितीनुसार, गुजरातमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान तोक्ते चक्रीवादळामुळे मागील २४ तासांत ६ जिल्ह्यांत, ३ किनापट्टी जिल्हात आणि ३ मलनाड जिल्ह्यात जोरदार ते अती मुसळधार पडला. आतापर्यंत ४ लोकांचा मृत्यू झाले असून ७३ गावांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.


हेही वाचा – Cyclone Tauktae: मुख्यमंत्र्यांची तोक्ते चक्रीवादळासंदर्भात तयारीची केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -