घरदेश-विदेशतितली वादळ : ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये हाहाकार

तितली वादळ : ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये हाहाकार

Subscribe

गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता तितली वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले आहे. सरकारने तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.

ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवर ‘तितली’ वादळ धडकले आहे. आपल्या रौद्र रुपाने ‘तितली’ वादळाने हाहाकार माजवला आहे. गुरुवारी सकाळी भुवनेश्वर येथील गोपालपूरच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकले. ओडिशामध्ये ताशी १२६ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये ताशी ५६ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशामध्ये या वादळामुळे झाडे जमीनदोस्त झाली आहेत तर विजेचे खांब कोसळले आहेत. त्याचबरोबर या भागात मुसळधार पाऊस देखील पडत आहे. चक्रीवादळाच्या या भयावह अवताराकडे बघून ओडिशा सरकारकडून १८ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

माहितीये का – ‘तितली’ वादळ म्हणजे काय? नाव आलं कुठून? जाणून घ्या

 

- Advertisement -

हेही वाचा  ‘तितली’ वादळाची भिती, ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता


तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले

हवामान विभागाने हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. या वादळात वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६५ किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सरकारने आंध्र प्रदेश आणि ओडिशा येथील तीन लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले की, गरज पडल्यास आणखी काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात येईल. राज्य सरकार परिस्थितीकडे पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्यास सांगितले गेले आहे.

- Advertisement -

ओडिशात परिस्थिती बदलली – ओडिशात ‘तितली’चा धुमाकूळ; ८ जिल्ह्यांमध्ये वादळ घुसलं!


ओडिशामध्ये शाळा, कॉलेज बंद

ओडिशामध्ये राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना ११ आणि १२ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर पुराची शक्याता असल्यामुळे अधिकाऱ्यांचीही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर ओडिशा सरकारने रेल्वे भर्ती बोर्डाची परीक्षा देखील रद्द केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -