घरदेश-विदेशCyclone Vayu Live Updates : गुजरातला 'वायू' धडकणार नाही

Cyclone Vayu Live Updates : गुजरातला ‘वायू’ धडकणार नाही

Subscribe

गुजरातच्या द्वारका आणि वेरावल समुद्रकिनाऱ्यावर या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यावर या दरम्यान १५० किमी ते १८० किमी ताशी वेगाने वादळ धडकणार आहे.

गुजरातसाठी दिलासादायक बातमी पुढे येत आहे. गुजरातला वायू वादळाचा फटक बसणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. आज वायूचा तडाखा सौराष्ट्रच्या किनारपट्टीला बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली गेली होती. मात्र किनारपट्टीपासून हे वादळ आता पुढे सरकत आहे. मात्र तरिही पुढचे २४ तास गुजरातमध्ये वादळासहीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 


 

- Advertisement -

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले वायू चक्रीवादळ गुरुवारी दुपारी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. गुजरातच्या द्वारका आणि वेरावल समुद्रकिनाऱ्यावर या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यावर या दरम्यान १५० किमी ते १८० किमी ताशी वेगाने वादळ धडकणार आहे. हवामान खात्याने समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुजरातच्या कच्छ, जामनगर, जूनागढ, द्वारका, पोरबंदर, राजकोट, अमरेली, भावनगर आणि सोमनाथ या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसंच या भागातील ५०० पेक्षा जास्त गावं खाली करण्यात आली आहेत. तर बुधवारी रात्रीपर्यंत ३ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोरबंदर, दीव, भावनगर, केशोद आणि कांडला एअरपोर्टवर गुरुवारी रात्रीपर्यंत विमान उड्डाण बंद करण्यात आली आहेत.

बचाव कार्यासाठी सज्ज

वायू चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी गुजरात सरकार सतर्क झाले आहे. एनडीआरएफच्या ५२ टीम, एसडीआरएफच्या ९ टीम, एसआरपीच्या १४ कंपनी, ३०० मरीन कमांडो आणि ९ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.

रेल्वेसेवा बंद

पश्चिम रेल्वेने बुधवारी सांगितले की, वायू चक्रीवादळामुळे ७० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. वेरावल, ओखा, पोरबंदर, भावनगर, भुज और गांधीधाम स्टेशनपर्यंत जाणाऱ्या सर्व पॅसेंजर आणि एक्स्प्रेस ट्रेन बुधवारी संध्याकाळी सहा ते शुक्रवार सकाळपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

शाळांना दोन दिवस सुट्टी

वायू चक्रीवादळाच्या परिणामांना लक्षात घेता समुद्रकिनाऱ्याजवळील जिल्ह्यांमध्ये अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील ११ जिल्ह्यातील शाळांना बुधवार आणि गुरुवारी सुट्टी देण्यात आली आहे.

विमान सेवा रद्द

कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व विमानतळावरील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पोरबंदर, दीव, भावनगर, केशोद आणि कांडला एअरपोर्टवर गुरुवारी रात्रीपर्यंत विमान उड्डाण बंद करण्यात आली आहेत. तसंच गुजरातकडे येणारी विमानसेवा देखील बंद करण्यात आली आहे.

चीनच्या जहाजांना थांबण्याची परवानगी

वायू चक्रीवादळापासून वाचण्यासाठी रत्नागिरी बंदरगाहवर चीनच्या १० जहाजांना थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोस्टगार्ड आईडी केआर सुरेश यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधानांनी केले ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘वायू चक्रीवादळामुळे प्रभावित होणाऱ्या सर्व लोकांची सुरक्षा आणि हितासाठी प्रार्थना करत आहे. सरकार आणि स्थानिक एजन्सी वादळाची माहिती देत आहेत. मी प्रभावित भागात राहणा-या लोकांना योग्य ती मदत देण्याची विनंती करतो.’

मदतीसाठी काँग्रेस कार्यकर्ते तयार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले की, वादळामूळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी कंबर कसा. राहुल गांधींनी ट्विट केले त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘वायू चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आले आहे. मी गुजरातच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना अपील करतो की, वादळाचा फटका बसलेल्या सर्व भागांमध्ये मदत करण्यासाठी तयार रहा. चक्रीवादळामुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रातील सर्व लोकांची सुरक्षा आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -