घरदेश-विदेश'तितली' वादळाची भिती, ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता

‘तितली’ वादळाची भिती, ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता

Subscribe

किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छिमारांनी पुढच्या २४ ते ४८ तासांत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासांत ‘तितली’ वादळाचा तडाखा भारताला बसू शकतो. पुढील २४ ते ४८ तासांत देशातील आणि विशेषत: उत्तर भारतातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे. ‘तितली’ हे वादळ येत्या काही तासांत बंगालच्या खाडीपर्यंत पोहचण्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. या भयानक वादळाचा तडाखा आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल,ओडिसा तसंच उत्तर पूर्वेकडील काही राज्यांना सोसावा लागू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. या तितली वादाळमुळे हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून या भागांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संबंधित राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी जागतिक तापमान वाढीमुळे भारताला उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. अशातच आता देशातील काही राज्यांवर ‘तितली’ वादळाची टांगती तलवार आहे.


वाचा: भारताला उष्णतेच्या लाटेचा बसू शकतो फटका

हवामान खात्याच्या अतिरिक्त महासंचालकांच्या माहितीनुसार, तितली वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या किनारपट्टीवरील भागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी पुढच्या २४ ते ४८ तासांत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आदेशही जारी करण्यात आले आहेत. हे चक्रीवादळ ओडिशा राज्यासाठी अधिक तीव्र आणि भयानक ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘या वादळामुळे ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि अन्य काही उत्तर-पूर्व राज्यांमध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसू शकतो त्यामुळे सर्वांनी पुढील ४८ तासांसाठी सतर्क राहावे’, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

वाचा: ५० हजार उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलले  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -