घरदेश-विदेशसिलिंडर स्फोटामुळे निर्माणाधीन इमारत कोसळली; सात कामगारांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

सिलिंडर स्फोटामुळे निर्माणाधीन इमारत कोसळली; सात कामगारांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

Subscribe

मिरठ – बसपाचे माजी आमदार चंद्रवीर सिंह यांच्या दौराला येथील जनशक्ती कोल्ड स्टोरेजमधील सिलिंडर फुटल्याने अमोनियाची गळती झाली आहे. स्फोटामुळ निर्माणाधीन इमारती कोसळली. यामुळे सात मजुरांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जेसीबी मशिनने ढिगारा हटवून खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

बसपाचे माजी आमदार चंद्रवीर सिंह यांचे दौराला येथे जनशक्ती कोल्ड स्टोरेज आहे. शुक्रवारी दुपारी कोल्ड स्टोरेजमध्ये लेंटर टाकण्याचे काम सुरू होते. यामध्ये 35 हून अधिक मजूर काम करत होते. दरम्यान, शीतगृहातील रेफ्रिजरेटरचा सिलिंडर फुटल्याने तेथे अमोनिया वायूची गळती झाली. स्फोटामुळे लेंटरचे शटर उडाले आणि संपूर्ण मलबा खाली काम करणाऱ्या मजुरांवर पडला. माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळ गाठून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा दिल्ली महापालिकेत पुन्हा भाजपा आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अपघाताची गंभीर दखल घेत अपघातातील जखमींवर उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

- Advertisement -

कोल्ड स्टोअरचे मालक चंद्रवीर सिंह यांची मुलगी मनीषा यांनी सांगितलं की, कर्मचाऱ्यांनी आजच कोल्ड स्टोअरमध्ये काम सुरू केले होते. कोल्ड स्टोअर दुर्घटनेची बातमी ऐकताच चंद्रवीर यांची प्रकृती खालावली असल्याने ते घटनास्थळी दाखल होऊ शकले नाहीत.

माहिती मिळताच मेरठचे एसएसपी आणि केंद्रीय राज्यमंत्री संजीव बल्यान घटनास्थळी पोहोचले. संजीव यांनी घटनास्थळी उपस्थित मजुरांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. दौरालाचे सीओ अभिषेक यांनी सांगितले की, सात जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 12 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. बचाव कार्य केले जात आहे. जेसीबी मशीनने डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा – कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लढाई, विकासासाठी भाजपच; अमित शाहांची टोलेबाजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -