घरताज्या घडामोडीपक्षात सर्वकाही ठीक आणि... उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर डी.के. शिवकुमारांची पहिली प्रतिक्रिया

पक्षात सर्वकाही ठीक आणि… उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर डी.के. शिवकुमारांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

कर्नाटकला ४८ तासांच्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. काँग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड केली आहे. या दोन्ही मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत लागली होती. परंतु के.सी.वेणुगोपाल यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची घोषणा केली. यावेळी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर डी.के.शिवकुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवकुमार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पक्षात सर्वकाही ठीक आहे आणि यापुढेही सर्व चांगलं होईल. आपल्या सर्वांना एकत्र काम करायचं आहे आणि ते आपण स्वीकारलं आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे, असं डी.के.शिवकुमार म्हणाले.

- Advertisement -

कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही याची हमी देण्यासाठी एकजूट आहोत, असं ट्वीट डी. के. शिवकुमार यांनी केलं आहे.

- Advertisement -

शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची ऑफरही देण्यात आली होती. मात्र, ती त्यांनी स्वीकारली नाही. तसेच काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना पर्यायाने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. या अंतर्गत सिद्धरामय्या यांना पहिली दोन वर्षे आणि नंतर शिवकुमार यांना पुढील तीन वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे होते. परंतु ही ऑफर दोघांनाही मान्य नव्हती. पण काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी डी. के. शिवकुमार यांची समजूत काढली असल्याचं राजकीय वर्तुळातून समोर येतंय. त्यामुळे डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.


हेही वाचा : कर्नाटकच नाही तर ‘या’ राज्यांतही काँग्रेसच्या दोन नेत्यांत आहेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -