घरदेश-विदेशलॅपटॉप अन् Ak-47 हाती घेत तालिबान रिझर्व्ह बँक गव्हर्नर सांभाळणार कारभार

लॅपटॉप अन् Ak-47 हाती घेत तालिबान रिझर्व्ह बँक गव्हर्नर सांभाळणार कारभार

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबानाच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा झाली आहे. यात अधिक खतरनाक दहशतवाद्यांना तालिबानी मंत्रिमंडळात मंत्रीपद देण्यात आलेय. यात अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी मुल्ला हसन अखूंदची निवड करण्यात आली. तर मुल्ला बरादर याला उपपंतप्रधान पदी बसवण्यात आले. तालिबानच्या या मंत्रिमंडळात सिराजुद्दीनं हक्कानीला एक महत्त्वाचे मंत्रिपद देण्यात आले. हक्कानीला गृहमंत्री पद देण्यात आले. तर तालिबानच्या काळ्या पैशाला अधिकृत करणाऱ्या हाजी मोहम्मद इदरिसला अफगाणिस्तानमधील रिझर्व्ह बँक द अफगाणिस्तानचे प्रमुख पद देण्यात आले.

हाजी मोहम्मद इदरिस याचा अफगाणिस्तान रिझर्व्ह बँकेचा पदभार स्वीकरल्यानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात त्याच्यासमोर एका बाजूला लॅपटॉप दिसतोय दुसरीकडे Ak-47 रायफल ठेवण्यात आली आहे. या इदरिसने ना आयुष्यात कधी पुस्तक वाचलय नाही बँकिंगचे शिक्षण घेतलेय. मात्र आता त्याला अफगाणिस्तानच्या बँकिंग सिस्टीमचा गर्व्हनर बनवण्यात आले.

- Advertisement -

मोहम्मद इदरिस नेमका आहे तरी कोण? 

तालिबानच्या माहितीनुसार, इदरिस आता अफगाणिस्तानमधील सरकारी संस्थांना संघटीत करत त्यांचे बँकासंबंधीत प्रश्न सोडवण्याचे काम करेल. मात्र इदरिस बँकेत लॅपटॉप अन् बंदूक घेवून बसलाय त्यावरून तो कशाप्रकारे प्रश्न सोडवू शकतो याचा अंदान न लावलेलाच बरा. इदरिसने बँकिंगविषयी घेतलेल्या शिक्षणासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप सार्वजनिक रित्या समोर आलेली नाही. त्याचं शिक्षण कितपत झालेयं याचीही काही उल्लेख नाही. शिवाय च्याने धार्मिक पुस्तकं वाचलीत का हे देखील स्पष्ट झालेले नाही. मात्र तो आता अफगाणिस्तानचे सर्व आर्थिक कारभार पाहणार आहे.

- Advertisement -

Covid-19 Update: कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; केंद्रीय मंत्रालयाचा इशारा!


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -