घरदेश-विदेश7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट; मोदी सरकारने 4 टक्के वाढवला...

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट; मोदी सरकारने 4 टक्के वाढवला DA

Subscribe

केंद्र सरकारने महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. प्रत्येकवर्षी मार्चमध्ये केंद्र सरकार डीएमध्ये वाढ करते.

- Advertisement -

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यावर सरकार 12 हजार 815 कोटी रुपये खर्च करणार आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, महागाई भत्ता 38% वरून 42% करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: गॅस सिलिंडर सबसिडीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोट्यावधी कुटुंबाला मिळेल दिलासा )

‘इतके’ पैसे वाढणार

महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा पगार वाढणार, त्याशिवाय पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. किती पैसे वाढणार ते उदाहरणासह समजून घेऊया. एखाद्या कर्मचा-याचा बेसिक पगार 25 हजार 500 रुपये आहे. सध्याच्या टक्क्यांच्या डीएनुसार त्याला 9690 रुपये मिळतात. जर डीए 42 टक्के झाला तर महागाई भत्ता 10 हजार 710 रुपये होईल, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1020 रुपये वाढीव वेतन मिळेल.

31 डिसेंबर, 2019 पर्यंत 7th Pay Commission च्या आधारावर वेतन घेणा-या सर्व कर्मचा-यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळत होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष कोरोनामुळे महागाई भत्त्यामुळे कोणताही वाढ झाली नाही. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. याला 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आले. सर्व कर्मचा-यांना वेतन अथवा पेन्शनधारकांना पेन्शन डीए एक जुलै 2021 पासून 31 टक्क्यांच्या दराने मिळत होता. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्त्यामध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. त्यानंतर गेल्यावर्षी यामध्ये 4 टक्के वाढ करण्यात आल्यामुळे डीए 38 टक्के झाला होता. आता यात पुन्हा 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 42 टक्के दराने सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्यात येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -