Covid-19 : नियमित माऊथ वॉश तुम्हाला कोविडपासून वाचवू शकतो? नेमक लॉजिक काय ?

daily simple mouthwash protect you from covid-19
Covid-19 : नियमित माऊथ वॉश तुम्हाला कोविडपासून वाचवू शकतो? नेमक लॉजिक काय ?

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचे समूळ नष्ट करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. दरम्यान एका आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाच्या रिसर्चमधून असा दावा करण्यात आला आहे की, माऊथ वॉशमध्ये कोरोना विषाणू नष्ट करण्याची क्षमता असल्याने तो तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकतो. त्यामुळे नियमत माऊश वॉशे केल्याने तुम्ही कोरोनापासून सुरक्षित राहू शकतात.

जर्नल ऑफ ओरल मेडिसिन अँड डेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. बाजारात मोठ्याप्रमाणात उपलब्ध असणाऱ्या स्वस्त माऊश वॉशमध्ये कोरोना विषाणूला नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे नियमित माऊश वॉश केल्यास तुम्ही कोरोना संरक्षण करु शकता. असा दावा या संशोधनात केला आहे.

या संशोधनात असेही नमुद करण्यात आले आहे की, कोरोना विषाणू व्यक्तीच्या तोंडामार्गे लाळेतून थेट फुफ्फुसात प्रवेश करतो. यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये शिरकाव करत व्यक्तीची रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला चढवतो. विशेषत: जर व्यक्तीला हिरड्यासंबंधीत काही आजार आजार असल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. तसेच कोरोना विषाणु हवेमार्फत तोंडातील लाळ आणि दातांभोवतीच्या जागेत झपाट्याने पसरतो. त्यानंतर फुफ्फुसात प्रवेश करत रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. त्यामुळे अनेकदा व्यक्तीचे परिस्थिती बिकट होत मृत्यूचा धोका निर्माण होतो.

त्यामुळे नियमित तोंड धुवत स्वच्छ केल्यास कोरोनापासून तुम्हा वाचू शकता. त्यामुळे शास्त्रज्ञांकडूनही दात नियमित मॉऊथ वॉशनी धुवून स्वच्छ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच हिरड्यांसंबंधीत आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

यावर युकेमधील बर्मिंगम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अभ्यास लेखक आयन चॅपल सांगतात, काही लोकांना कोरोनामुळे फुप्फुसाचा आजार होतो आणि इतरांना का होत नाही याचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन मदत करु शकते. ज्यामुळे कोरोना विषाणूचे समूळ नष्ट करण्यासाठी नवीन मार्ग सापडले. त्यामुळे तुम्हीही नियमत तोंड, दात स्वच्छ ठेवत विषाणूपासून स्वत:चे रक्षण करा. असेही चॅपल म्हणाले.

या संशोधकांनातून असेही समोर आले की, हिरड्यांचा रोग आणि हिरड्यांसंबंधीत आजारामुळे झालेल्या जमखमेतून कोरोना विषाणू थेट रक्तात प्रवेश करतो. त्यामुळे तुमच्या तोंडातील प्लेड बिल्ड अप कमी करण्यासाठी विशिष्ट माउथ वॉशचा वापर करा, तोंड स्वच्छ पाण्याने त्यामुळे तोंडात लाळीचे प्रमाण कमी होईल आणि संसर्ग न होण्यास मदत होईल. नियमित माऊश वॉश केल्यास कोरोनामुळे फुफ्फुसासंबंधीत होणारा आजार आणि गंभीर लक्षणांपासून बचाव करता येणार आहे.