Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी चित्याच्या मृत्यू; 'हे' आहे कारण...

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी चित्याच्या मृत्यू; ‘हे’ आहे कारण…

Subscribe

दक्षिण आफ्रिकेतून आणलेली आणि मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवलेल्या दक्षा या मादी चित्त्याचा उद्यानातल्या इतर चित्त्यांशी झालेल्या भांडणात मृत्यू झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आणलेली आणि मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवलेल्या दक्षा या मादी चित्त्याचा उद्यानातल्या इतर चित्त्यांशी झालेल्या भांडणात मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षाचा मृत्यू फिंडा या चित्त्याशी झालेल्या भांडणात झाला. ज्यात वायू आणि अग्नि यांचा देखील समावेश होता. दक्षिण आफ्रिका आणि निमिबियामधून चित्ते आणल्यापासून कुनोमध्ये मरण पावलेला हा तिसरा चित्ता आहे. ( Daksha a female cheetah brought from South Africa and housed in Madhya Pradeshs Kuno National Park has died )

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये हे सर्व चित्ते सोडण्यात आले आहेत. यातील मादी चित्ता दक्षा हिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यावेळेस तिच्या मृत्यूचे कारण आजारपण नसून लढाई आहे. तिची इतर चित्यांसोबत कडाक्याची झुंज झाली. समोर आलेल्या माहितीनुसार चित्ता दक्षा आणि धीराची नर चित्ता फिंडा, वायू आणि अग्नि यांच्याशी लढाई झाली. यामध्ये दक्षाचा मृत्यू झाला.

साशा चित्ताचा गंभीर आजाराने मृत्यू 

- Advertisement -

यापूर्वी 28 मार्चला चित्ता साशाचा मृत्यू झाला होता. 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आलेल्या आठ चित्त्यांपैकी साडेचार वर्षांच्या साशा चा समावेश होता. साशा 22 जानेवारीपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होती. भारतात स्थलांतरित करण्यापूर्वी साशाला किडनीचा आजार होता. नामिबियामध्ये तिच्यावर ऑपरेशनही करण्यात आले होते. मात्र, ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली होती, असा दावा करण्यात येत आहे.

( हेही वाचा: Congress Files : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील ‘सिग्नोरा गांधी’ कोण? भाजपाचा सवाल )

उदयचाही झाला होता मृत्यू

- Advertisement -

मागच्या महिन्यात चित्ता उदय याचा मृत्यू झाला होता. चित्ता उदय हा  मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे समजले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाईज केलं. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वाॅर्डमध्ये ठेवलं होतं. मात्र, नंतर  उदयचा मृत्यू झाला .

 

- Advertisment -