घरताज्या घडामोडीतिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; विमानातील 'इतक्या' प्रवाशांचा जीव धोक्यात

तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; विमानातील ‘इतक्या’ प्रवाशांचा जीव धोक्यात

Subscribe

कालिकतहून दमामला जाणाऱ्या विमानाचे केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात झालेल्या हायड्रॉलिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

कालिकतहून दमामला जाणाऱ्या विमानाचे केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात झालेल्या हायड्रॉलिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ज्यावेळी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, त्यावेळी विमानात 182 प्रवासी होते. त्यामुळे या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. (Dammam Bound AI Express Flight Emergency Landing On Thiruvananthapuram Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी एयर-इंडिया एक्सप्रेस IX 385 या विमानाने कालिकत येथून सौदी अरेबियाच्या दम्मामकडे उड्डाणे केले होते. मात्र, उड्डाणावेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. त्यामुळे विमानाच्या हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. त्यानंतर या विमानाचे 12.15 वाजता तिरुअनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

- Advertisement -

थोडक्यात अनर्थ टळला!

ज्यावेळी विमानाचे आपत्कालिन लँडिंग करण्यात आले. त्यावेळी विमानात 182 प्रवासी होते. विमान अचानक तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात आल्याने येथील विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली होती. टेकऑफवेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानातील इंधन अरबी समुद्रात रिकामे केले. त्यानंतर तिरूअनंतपुरम येथील विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. दरम्यान, वैमानिकाच्याप्रसंगावधाने या विमानाचा मोठा अपघात टळला असून, १८२ प्रवाशांची जीव वाचला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मागील अनेक काळापासून विमानाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


हेही वाचा – खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल, आव्हाडांनी व्यक्त केला संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -