घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

Subscribe

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरु झाल्या आहेत. नक्षलवाद्यांनी दूरदर्शनच्या टीमवर हल्ला केला या हल्ल्यात दोन पोलीस शहीद आणि दूरदर्शनचा कॅमेरामन यांचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपुर भागात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. निलावाया भागातील दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये दोन पोलीस शहीद झाले तर दूरदर्शनचा एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातही शनिवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले होते. निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांनी सुरु केलेल्या या कारवायांमुळे दहशतची वातावरण आहे.

- Advertisement -

हल्ल्यात दोन पोलीस शहीद

डीआयडी पी सुंदर यांनी या घटनेसंदर्भात सांगितले आहे की, आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुका पाहता सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस सर्च ऑपरेशनसाठी निघाले होते. तसंच दूरदर्शन या वृत्तवाहिनीची तीन सदस्यांची टीम जवानांसोबत जात होती. त्या दरम्यान लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर फायरिंग करायला सुरुवात केली. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर दूरदर्शनचे कॅमेरामन यांचा मृत्यू झाला. सुरक्षा लक्षात घेताल अतिरिक्त बल घटनास्थळावर पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू

दूरदर्शनची टीम या भागात नेमकी कशासाठी गेली होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही टीम परतत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एसआई रुद्र प्रताप आणि असिस्टंट कॉन्स्टेबल मंगलू शहीद झाले. तर कॉन्स्टेबल विष्णु नेताम आणि असिस्टंट कॉन्स्टेबल राकेश कौशल जखमी झाले आहे. तर या हल्ल्यात दूरदर्शन या वृत्तवाहिनीचा कॅमेरामन अचितनंद साहू यांचा मृत्यू झाला आहे. तर दूरदर्शच्या टीममधील इतर दोन जणू तिथेच अडकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -