घरताज्या घडामोडीUP Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपला गळती, स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर...

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपला गळती, स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर दारा सिंह चौहानांचा राजीनामा

Subscribe

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून उत्तर प्रदेशात भाजपला गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अजून एक धक्का बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आता पर्यावरण मंत्री दारा सिंह चौहान यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दारा सिंह चौहान मऊ जिल्ह्यातील मधुबन विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. चौहानांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात वन आणि पर्यावरण मंत्री विभागाची जबाबदारी मी उत्तमरित्या सांभाळली आणि चांगलं कार्य देखील केलं. परंतु दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि व्यापाऱ्यांची घोर उपेक्षा झाल्यामुळे मी योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचं दारा सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 दरम्यान, उत्तर प्रदेशमधून भाजपचे एक मंत्री आणि चार आमदारांनी राजीनामा देत भाजपला दणका दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्यांनी राजीनामा दिल्यानंतर योगी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपला जोरदार धक्का देण्यासाठी माझा राजीनामाच पुरेसा आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे, असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मौर्य यांच्यानंतर पर्यावरण मंत्री दारा सिंह चौहान यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. परंतु चौहानांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करत फेरविचार करण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

स्वामी प्रसाद मौर्यांविरोधात अटक वॉरंट जारी 

उत्तर प्रदेश सरकारमधील माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु धार्मिक भावना संदर्भात भडकावल्या प्रकरणी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच त्यांना २४ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


हेही वाचा : UP elections 2022 : माझा राजीनामा भाजपला धक्का देण्यासाठी पुरेसा – स्वामी प्रसाद मौर्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -