घरदेश-विदेशकानपूरमध्ये काळी रात्र! दोन अपघातात ३२ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक

कानपूरमध्ये काळी रात्र! दोन अपघातात ३२ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक

Subscribe

एकाच रात्री दोन मोठे अपघात घडले आहेत. घाटमपूर परिसरातील तलावात ट्रॅक्टर ट्रॉली उटलून तब्बल २७ जणांचा मृत्यू झालाय. तर, अहिरवण उड्डाणपुलावरही ट्रकची लोडरला धडक लागली आणि या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. 

कानपूर – कानपूरच्या लोकांसाठी शनिवारची रात्र काळी रात्र ठरली आहे. एकाच रात्री दोन मोठे अपघात घडले आहेत. घाटमपूर परिसरातील तलावात ट्रॅक्टर ट्रॉली उटलून तब्बल २७ जणांचा मृत्यू झालाय. तर, अहिरवण उड्डाणपुलावरही ट्रकची लोडरला धडक लागली आणि या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब विंध्याचल धाम येथे मुंडन विधीसाठी जात असताना अहिरवण उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. जिल्हा दंडाधिकारी विशाक अय्यर यांनी ५ जणांच्या मृत्यूची माहिती दिली. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून उपचारांसाठी हॅलेट रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा फुटबॉल मॅच हरले म्हणून समर्थक भिडले, हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले

- Advertisement -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूर जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. यासोबतच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- चांदणी चौकातील पूल अखेर इतिहासजमा, ढिगारा हटवण्याचं काम सुरू

पहिल्या अपघातात 26 ठार

दारुच्या नशेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालकामुळे तब्बल २७ जणांचे प्राण गेले आहेत. दारुच्या नशेत असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तलावात जाऊन कोसळली. या अपघातात २२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांनी उपचारांदरम्यान प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच आयुक्त, डीएम, एसपी कानपूर आऊटर आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. यासोबतच ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केवळ शेतीच्या कामासाठी करावा, प्रवासी नेण्यासाठी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -