अमेरिकेतही दशहरी, लंगडा आंबा चाखायला मिळणार ; भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिकेच्या बाजारपेठा खुल्या होणार

Dashahari, langada mango will also be tasted in America; US markets will be open for Indian exporters
अमेरिकेतही दशहरी, लंगडा आंबा चाखायला मिळणार ; भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिकेच्या बाजारपेठा खुल्या होणार

व्यापाराच्या विषयावर अमेरिकेने भारतीय निर्यातदारांना दिलासा दिला आहे.देशांतर्गत भारतीय निर्यातदार ‘दशहरी’ आणि ‘लंगडा’सारखे आंबे अमेरिकेला निर्यात करू शकतात. अमेरिकेने भारताच्या नियुक्त एजन्सींकडून चाचणी प्रमाणपत्रे स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन यांनी मंगळवारी चार वर्षांनंतर आयोजित व्यापार धोरणावर संयुक्त करारावर स्वाक्षरी केली.त्यामुळे भारतातील कृषी उत्पादनांच्या निर्यातदारांसाठी अमेरिकेच्या बाजारपेठांचे मार्ग खुले झाले असून, भारतातील आंबा, डाळिंब आणि द्राक्ष आता अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये पाठवण्यात येणार आहेत.

व्यापार धोरण मंचाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीदरम्यान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन यांनी निर्यातीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. भारतातून आंबा, डाळिंब निर्यात करण्याबाबत मंजूरी दिली.याशिवाय अमेरिकेतून चेरीची आणि पशुखाद्यात वापरल्या जाणार्‍या ‘अल्फल्फा ‘ याची भारतात आयात करण्यात येईल.महासंचालक अजय सहाय म्हणाले की,अमेरिका ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे आणि तिच्या प्रवेशामुळे केवळ निर्यातीला चालना मिळणार नाही तर आंबा उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळण्यास मदत होईल.

विहित व्यवस्थेनुसार, फळे आणि वनस्पतींच्या आरोग्यावर देखरेख करण्याशी संबंधित यूएस निरीक्षक प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी येथे येतात. याला निर्यात करण्यापूर्वी पूर्व-मंजुरी प्रक्रिया म्हणतात.भारतातून आंबा आणि डाळिंबाची निर्यात सुलभ करण्यासाठी, यूएस दोन्ही फळांसाठी पूर्व-मंजुरी कार्यक्रम/विकिरण नियामक निरीक्षणाचे हस्तांतरण अंतिम करेल आणि ते भारतीय अधिकाऱ्यांना सादर करेल, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. भारतानेही प्राधान्य व्यापाराचा दर्जा मागे घेण्याची मागणी केली असून, या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. याशिवाय दोन्ही देशांनी आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


हे ही वाचा :Pandu Trailer: बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच