कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees’ Provident Fund Organization) खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जवळपास २८ कोटी पीएफ खातेधारकांचा (PF account holder) डेटा ऑनलाईन लीक (Date leek) झाला आहे. यामुळे आधार कार्डची माहिती आणि बँक अकाऊंटचा नंबरही सार्वजनिक झाला आहे.
युक्रेनच्या सायबर सुरक्षा संशोधक बॉब डियाचेंको (Bob Diachenko) यांनी हा दावा केला आहे. दोन वेग-वेगळ्या आयपी अॅड्रेसवरून खातेधारकांची माहिती लीक झाली असल्याचं २ ऑगस्ट रोजी डियाचेंकोला माहिती पडलं. यामध्ये पहिल्या आयपी अॅड्रेसवरून २८,०४,७२,९४१ खातेधारकांची माहिती तर, दुसऱ्या आयपी अॅड्रेसवरून ८३,९०,५२४ खातेधारकांची माहिती लीक झाली आहे.
हेही वाचा – आरबीआयचा निर्णय : कर्ज महागले; रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची वाढ
लीक झालेल्या माहितीमुळे पीएफ खातेधारकांचा युएएन नंबर, नाव, आधार कार्डची माहिती, बँक अकाऊंट नबंरसहित नॉमिनीचीही माहिती सार्वजनिक झाली आहे. हे दोन्ही आयपी अॅड्रेस Azure आधारित आणि भारत आधारित होते.
माहिती लीक झाल्याचं कळताच डियाचेंको यांनी ट्विटद्वारे तत्काळ माहिती दिली. त्यांनी हे ट्विट इंडियन कॉम्प्युटर इमरजेंसी रिन्स्पॉन्स टीमलाही टॅग केले आहे. CERT-In ने त्यांच्या ट्विटची दखल घेतली असून यासंदर्भात मेल करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – नोटाबंदी फसली? बोगस नोटांचा बाजारात पुन्हा सुळसुळाट
दरम्यान, डियाचेंको यांनी ट्विट केल्याच्या १२ तासानंतर दोन्ही आयपी अॅड्रेस हटवण्यात आले आहे. तिथे कोणतीही माहिती अस्तित्वात नसल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, गेल्या ३ ऑगस्टपासून डेटासंबंधित कोणत्याही एजन्सीने कोणतंच उत्तर दिलेलं नाही.