Video: आईला मुलींना आळीपाळीने तोंडावाटे ऑक्सिजन दिला, ऑक्सिजनअभावी डोळ्यादेखतच तडफडून झाला मृत्यू

ऑक्सिजन न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

daughter giving oxygen through mouth to her mother,mother died due to lack of oxygen in Lucknow video viral
आईला मुलींना आळीपाळीने तोंडावाटे ऑक्सिजन दिला, ऑक्सिजनअभावी डोळ्यादेखतच तडफडून झाला मृत्यू

देशात वेगाने होणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे देशात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीव जात आहेत. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झालेल्या अनेकांच्या धक्कादायक घटना दररोज आपल्या समोर येत आहेत. असाच एक प्रकार लखनऊमधून समोर आला आहे. आपल्या आईला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तिचा जीव वाचवण्यासाठी मुलींनी आपल्या तोंडावाटे आईला ऑक्सिजन देण्याच्या प्रयत्न केला. मात्र आईचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला असे म्हटले जात आहे.


आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मुलींनी तिला लखनऊच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या दोन मुली ऑक्सिजनसाठी रुग्णालयात फिरत होत्या मात्र त्यांनाऑक्सिजन मिळाले नाही. त्यामुळे आईला वाचवण्यासाठी मुलींनी आपल्या तोंडावाटे ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार लपवण्यासाठी रुग्णालयाने महिलेचा मृतदेह तात्काळ तेथून दुसरीकडे हलवला असा आरोप रुग्णालयावर करण्यात आला आहे.

दरम्यान रुग्णालयाच्या मुख्य अधीक्षक डॉ. डीके सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, महिलेला रुग्णालयात आणताच तिचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होता. मात्र महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या दोन्ही मुली भावनिक झाल्या होत्या कारण ती त्यांची आई होती. म्हणून त्यांनी तोंडावाटे महिलेला ऑक्सिजन  देण्यास सुरुवात केली. घाई गडबडीत महिलेची कोणतीही रितसर माहिती मिळू शकली नाही. महिलेचा मृत्यू होताच तिचे नातेवाईक मृतदेह घेऊन तात्काळ तिथून निघून गेले, असे त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.


हेही वाचा – Corona Crisis: कोरोनाशी लढताना भारताने चीनचे ‘फिल्ड हॉस्पिटलचे’ मॉडेल वापरावे, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांची सूचना