भारतात Zydus Cadilaच्या ZyCoV-D लसीला आपत्कालीन वापरासाठी DCGI ची मंजुरी

कंपनीने झायकोव-डी लसी १२ ते १८ वयोगटातील लहान मुले त्याचप्रमाणे ६६ वर्षांवरील वृद्धांसाठी प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

coronavirus Zydus Cadila starts supply of COVID-19 vaccine ZyCoV-D to govt
भारतात तीन डोस असलेल्या Zydus Cadila लसीचा पुरवठा सुरु; सुईशिवाय मिळणार लस

भारतात झायडल कॅडिलाच्या (Zydus Cadila) लसीला आपत्कालीन वापरासाठी DCGI कडून परवानगी देण्यात आली आहे. झायडस कॅडिलाची झायकोव-डी (ZyCoV-D)  ही तीन डोस असलेली लस भारतात उपलब्ध होणार असून १२ वर्षांवरील मुलांना आणि त्याचप्रमाणे वृद्धांनादेखील देण्यात येणार आहे. (DCGI approves Zydus Cadila’s ZyCoV-D vaccine for emergency use in India)  )   भारतीय कंपनी झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळावी यासाठी आवेदन केले होते.  ५० हून अधिक ठिकाणी झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीची ट्रायल घेण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी क्लिनिकल ट्रायल असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. जवळपास २८ हजारांहून अधिक लोकांवर झायकोव-डी लसीची ड्रायल करण्यात आली आणि त्याचे अत्यंत चांगेल परिणाम समोर आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

ट्रायलच्या रिपोर्टनुसार, कंपनीने झायकोव-डी लसी १२ ते १८ वयोगटातील लहान मुले त्याचप्रमाणे ६६ वर्षांवरील वृद्धांसाठी प्रभावी असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे बिना सुईचा वापर करता ही लस लोकांना देता येणार आहे. मशीनच्या मदतीने ही लस लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार असून देशातील ही पहिली प्लाज्मिड लस असणार आहे जी बिना सुई इजेक्टर शिवाय देता येणार आहे.

झायडल कॅडिला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली सहावी लस आहे. देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस,रशियाची स्पुटनिक लस त्याचप्रमाणे अमेरिकेची मॉडर्ना लस आणि जॉन्सन अँड जॉन्सन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवागनी देण्यात आली आहे. तर जॉन्सन अँड जॉन्सन लसीला देशात १२ ते १७ वयोगटातील लहान मुलांच्या ट्रालसाठी कंपनीने परवानगी मागितली आहे.


हेही वाचा – johnson and johnson ने लहान मुलांवरील लसीकरण चाचणीच्या परवानगीसाठी CDSCO कडे केला अर्ज