घरताज्या घडामोडीBooster Dose: भारत बायोटेकच्या Intranasal Booster डोसच्या ट्रायलला DCGIची मंजूरी

Booster Dose: भारत बायोटेकच्या Intranasal Booster डोसच्या ट्रायलला DCGIची मंजूरी

Subscribe

भारत बायोटेकच्या (BharatBiotech) इंट्रानॅसल बूस्टर डोसच्या (intranasal booster dose) ट्रायलसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India, DCGI) मंजूरी दिली आहेत. यापूर्वी हैदराबाद स्थित कंपनी भारत बायोटेकने ज्या लोकांसाठी बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्यांनी अगोदर कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हक्सिनचा (Covaxin) डोस घेतला होता.

- Advertisement -

माहितीनुसार, भारत बायोटेकचे लक्ष्य ५ हजार लोकांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचे आहे. यामध्ये ५० टक्के कोविशिल्ड आणि ५० टक्के कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या लोकांचा समावेश असेल. दरम्यान दुसरा डोस आणि तिसऱ्या डोसदरम्यान सहा महिन्यांचा कालावधी असू शकतो. जर ट्रायल वेळेवर केले गेले तर भारतात मार्च महिन्यापासून इंट्रानॅसल बूस्टर डोस देण्याची आशा आहे. यामुळे देशातील कोरोना विरोधातील लढाई आणखीन मजबूत होईल.

इंट्रानॅसल लस काय आहे?

नोवेल एडेनोव्हायरस वेक्टरवर आधारित BBV154 कोरोनाविरोधात एक इंट्रानॅसल लस आहे, जी IgG, म्युकोसल IgAआणि टी-सेल्स मजबूत करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती तयार करते. विशेष म्हणजे हे नोवेल कोरोना व्हायरस संसर्ग आणि फैलाव दोन्ही रोखण्यास मदत करते. ही लस सुई मुक्त आहे. यामुळे जखम आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: केंद्राने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध; गृह सचिवांनी दिला सर्व राज्यांना महत्त्वाचा सल्ला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -