घरCORONA UPDATEआज कोरोना लसीबाबत होणार मोठी घोषणा? DCGI ची ११ वाजता पत्रकार परिषद

आज कोरोना लसीबाबत होणार मोठी घोषणा? DCGI ची ११ वाजता पत्रकार परिषद

Subscribe

DCGI आज लसीकरणांच्या तारखा घोषित करणार?

भारताला नव्या वर्षात कोरोना लसीचं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. नवं वर्ष देशासाठी आनंददायी ठरत आहे. १ जानेवा २०२१ भारताने पहिल्या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरला परवानगी दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहिल्या स्वदेशी कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्याने, आनंद द्विगुणित केला आहे. जरी कोरोना लसीसाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. तरी अंतिम मंजुरीसाठी आता सर्वांचं लक्ष ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे आहे. डीसीजीआय रविवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपात्कालीन वापरासाठी तज्ञ समितीने आतापर्यंत दोन लसी (‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’) यांना ग्रीन सिग्नल दिलं आहे.

केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने डीसीजीआयकडे भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ आणि सीरम संस्थेच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. अशा परिस्थितीत आता डीसीजीआय या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देईल अशी अपेक्षा आहे. आज सकाळी ११ वाजता डीसीजीआय पत्रकार परिषद घेत मोठई घोषणा करण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी डीसीजीआयची परवानगी महत्त्वाची असते.

- Advertisement -

जेव्हा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) औषधला परवानगी देते तेव्हाच कंपनीला त्याचा वापर करण्याची परवानगी दिली जाते. या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयने मान्यता दिल्यानंतर कोरोना लसीकरण लवकरच भारतात सुरू होईल. तथापि, कोरोना लसीचं ड्राय रन देशात २ जानेवारीपासून सुरू करण्यात आलं आहे. ड्राई रनचे परिणाम खूप सकारात्मक होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही याबाबत आढावा बैठक घेतली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -