Land Scam: तेजस्वी यादवांची सीबीआय चौकशीला गैरहजेरी, नेमकं काय आहे कारण?

tejashwi yadav
तेजस्वी यादव

जमीन घेऊन नोकरी दिल्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची पत्नी राबडी देवी यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र, त्यानंतर आता या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. काल(शुक्रवार) तेजस्वी यादव यांना सीबीआयने पुन्हा एकदा समन्स पाठवून आज चौकशीला बोलावण्यात आले होते. परंतु पत्नीच्या प्रकृतीचं कारण देत त्यांनी आज सीबीआय चौकशीला गैरहजेरी लावली आहे.

तेजस्वी यादव यांना ४ फेब्रुवारी रोजी सीबीआयकडून समन्स पाठवण्यात आले होते. परंतु त्यावेळीही त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवण्यात आले होते. परंतु पत्नीच्या प्रकृतीचं कारण देत त्यांनी आज सीबीआयच्या चौकशीसमोर येणं टाळलं.

कालच त्यांच्या पत्नीला दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या गरोदर असल्यामुळे आणि त्यांची १२ तास चौकशी केल्यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यामुळे तेजस्वी यादव सीबीआयच्या चौकशीला गेले नाहीत.

या नोकरी घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पाटणामधील २० हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यात लालूप्रसाद यांच्या मुलींच्या घरावरही छापा टाकला होता. यासोबतच तेजस्वी यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला होता. ईडीच्या छाप्यांमध्ये ५३ लाख रुपये रोख, USD 1900, सुमारे ५४० ग्रॅम सोने आणि १.५ किलो सोन्याचे दागिने मिळाले.


हेही वाचा : लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; मुलींच्या घरी ईडीची छापेमारी