Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अल्पवयीन मुलासोबत अश्लील व्हिडिओ करणं पडलं महाग!

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अल्पवयीन मुलासोबत अश्लील व्हिडिओ करणं पडलं महाग!

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका महिलेने नात्याला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. सध्या या महिलेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या महिलेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती स्वतःच्या अल्पवयीन मुलासोबत अश्लील डान्स आणि अॅक्टिंग करताना दिसत आहे. यामुळे दिल्ली महिला आयोगाने (डीसीडब्ल्यू) एक कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवून महिलेविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

दिल्ली महिला आयोगाने म्हटले आहे की, या छोट्या वयात मुलाला महिला आक्षेपार्ह शिकवण देत आहे. तेही आई असून. अशाप्रकारे व्हिडिओ बनवून फक्त वाईट शिकवत दिली जात आहे असे नाही तर आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासला जात आहे. अशी शिकवण दिल्यानंतर पुढे मुलगा मुलीच्या प्रती कसा विचार करेल? असा सवाल केला आहे. तसेच भविष्यात मुलाची मानसिकता गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाईल. त्यामुळे महिले विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि मुलाचे समुपदेशन करावे, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

महिलेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लहान मुलाला अश्लील प्रकारे अॅक्टिंग आणि गाण्यांवर डान्स करायला लावले जात आहे. हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण सोशल मीडियावर खळबळ माजल्यानंतर व्हिडिओ डिलीट केला आहे. या महिलेचे इन्स्टाग्रामवर १ लाख ६० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Porn apps Case : राज कुंद्रापाठोपाठ आणखी एका आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई


 

- Advertisement -