DDMA Guidelines Today : दिल्लीत कोरोना निर्बंध शिथील: नाईट कर्फ्यू हटवला, काय आहेत नवे नियम?

DDMA Guidelines Today delhi covid restrictions ddma decided to light night curfew in delhi
DDMA Guidelines Today : दिल्लीत कोरोना निर्बंध शिथील: नाईट कर्फ्यू हटवला, काय आहेत नवे नियम?

राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने दिल्लीतील कोरोना निर्बंध मोठ्याप्रमाणात शिथील करण्यात येत आहेत. दिल्लीत शुक्रवारी डिजास्टर मॅनेजमेंट कमिटीच्या मिटिंगमध्ये सोमवार म्हणजे 27 फेब्रुवारीपासून नाईट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटत असल्याने DDMA ने अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्लीत आता मेट्रो आणि बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार आहे. तसेच दिल्लीत विना मास्क फिरणाऱ्यांसाठी निश्चित केलेला 2000 हजार रुपयांची दंडाची रक्कम कमी करत 500 रुपये करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत रात्री उशीरापर्यंत रेस्टारंट, बार, दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना कोरोनापासून वाचण्यासाठी काही आवश्यक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

DDMA च्या बैठकीत कोणते निर्णय झाले?

१) दिल्लीत सोमवारपासून नाईट कर्फ्यू हटवण्यात आला आहे.

२) मेट्रो आणि बसेसमध्ये उभं राहून प्रवास करण्यात परवानगी

३) विनामास्क फिरणाऱ्यांवर आता 500 रुपयांचा दंड

४) १ एप्रिलपासून शाळा पूर्णपणे ऑफलाईन सुरु होणार आहेत.

याशिवाय दिल्लीतून कोरोनासंबंधीत सर्व नियम लवकरचं हटवले जाणार आहेत. यामुळे दिल्लीकरांना 1 मार्चपासून पर्यटन स्थळे, प्राणीसंग्रहायले पूर्णपणे खुली होणार आहेत. यामुळे दरदिवसा 3 हजार नागरिकांना फिरण्याची परवानगी असेल.

नाईट कर्फ्यू हटवल्याने काय फायदा होईल?

दिल्लीत यापूर्वी रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. नागरिकांना कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कुठेही बाहेर जाण्या- येण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. याशिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार केवळ 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी होती, यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. यापूर्वी 27 जानेवारी 2022 रोजी दिल्ली सरकाराने राज्यातील अनेक कोरोनासंबंधीत निर्बंध शिथील केले होते. यानंतर आता DDMA च्या बैठकीत पुन्हा राजधानीला निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.