Corona : चिंता वाढली! भारतात कोरोनाचा हाहाकार, दुसऱ्या लाटेच्या पुनरावृत्तीची शक्यता

भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आत्तापर्यंत 154 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतात डेल्टामुळे आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. आता ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

New Covid Treatment Guidelines India Cuts Use of Remdesivir Tocilizumab Multivitamins Steroids in Covid-19 Treatment
New Covid Treatment Guidelines: कोरोनानंतर सततचा खोकला असू शकतो टीबी; स्टिरॉइडचा वापर टाळा

कोरोना व्हायरसबाबत संयुक्त राष्ट्र संघाने (UN) भारताला इशारा दिला आहे. यूएनच्या अहवालात असा दावा करण्यात आला की, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे म्हणजेच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे एप्रिल ते जूनदरम्यान 2.4 लाख लोकांचा मृत्यू धाला आणि याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून आला. एवढेच नाही तर आगामी काळातही दुसऱ्या लाटेच्या पुनरावृत्तीचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

Covid-19 Treatments : कोरोनावर आता दोन नव्या पद्धतीने होणार उपचार; WHO ने दिली मान्यता

UN च्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स (WESP) 2022 च्या अहवालानुसार, ओमिक्रॉनमुळे नवीन लाट येत आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही अधिक जाणवेल. तर एप्रिल ते जून या कालावधीत भारतात डेल्टामुळे 2.4 लाख लोकांचा मृत्यू झाला.

UN च्या या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सर्व देशांपर्यंत पोहचावी असा दृष्टीकोन जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत महामारी रोखणे कठीण आहे. यामुळे जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल. विशेषत; दक्षिण आशियातील देशांना याचा सर्वाधिक सामना करावा लागेल. लसीकरणाचा वेग मंदावला तर कोरोनाचे व्हेरिएंट वाढत राहतील आणि त्यामुळे रुग्णसंख्याही वेगाने वाढेल.

भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आत्तापर्यंत 154 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतात डेल्टामुळे आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. आता ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.


covid cases in india : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग, 24 तासात 2 लाख 64 हजार नवे रुग्ण