घरताज्या घडामोडीपैज पडली महाग! खजिन्यासाठी खड्डा खोदायला गेले अन् गमावून बसले जीव

पैज पडली महाग! खजिन्यासाठी खड्डा खोदायला गेले अन् गमावून बसले जीव

Subscribe

खजिनाचा खड्डा खोदण्यासाठी काही मित्रांमध्ये पैज लागली होती. जो खजिन्याच्या खड्डा खोदले त्या प्रत्येकाला दहा हजार रुपये मिळतील अशी पैज लागली होती. पण जेव्हा खड्डा खोदून झाला तेव्हा पैजेचे पैस न देण्यासाठी जलेबी आणि लाडूमध्ये विष मिसळून तीन जणांचा खायला दिले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील आहे. याप्रकरणात भिंड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरुद्धात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी मौ पोलीस स्टेशनला मदनपुरा गावाजवळील शेतात खजिना शोधण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मौ पोलीस स्टेशनच्या परिसरातील मदनपुरा गावाजवळच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह गोहद पोलीस स्टेशनच्या परिसरात सापडला. होतम सिंह आणि उमेश सिंह अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर लक्ष्मण सिंह नावाचा एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता.

- Advertisement -

लक्ष्मण सिंह जेव्हा शुद्धीत आला तेव्हा त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे खजिन्याचा खड्डा खोदण्यासाठी गेले होते. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. होतमचा जीव गेल्यानंतर लक्ष्मण स्वतः बेशुद्ध झाला. उमेशच्या मृत्यूबद्दल त्याला काही माहित नव्हते. यावेळी घटनास्थळी इतर तीन लोक होते. ज्यांनी खजिन्यासाठी खड्डा खोदण्याकरिता पहिल्यांदा पूजा अर्चा केली होती आणि त्यांना लाडू आणि जलेबी खायला दिली होती. या जबाबनंतर पोलिसांचा संशय आणखी वाढला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता इतर खजिना शोधण्यासाठी होतम, उमेश आणि लक्ष्मण यांच्यासह कोण होते यांच्या शोध लावला. पोलिसांनी याप्रकरणातील आरोप रामदास गुर्जर, थान सिंह कुशवाहा आणि खलीफा सिंह कुशवाह यांना ताब्यात घेतले आहे.

चौकशी दरम्यान आरोपी तिघांनी सांगितले की, ‘खड्डा खोदण्यापूर्वी होतम आणि उमेश यांनी खलीफा कुशवाहसोबत पैज लावली होती की, जर होतम आणि लक्ष्मणने खजिन्यासाठी खड्डा खोदला तर त्यांना खलीफा १० हजार रुपये देईल. पण जर खजिन्यासाठी खड्डा खोदू शकले नाही तर होतम १० हजार रुपये खलीफाला द्यावे लागतील.’

- Advertisement -

पैज लावल्यानंतर होतम आणि लक्ष्मण यांनी खजिन्यासाठी ५ फूट खड्डा खोदला. जेव्हा खलीफाला १० हजार रुपये देण्याची वेळ आली तेव्हा तो प्रसाद घेण्यासाठी आपल्या साथीदारोबत गेला आणि रस्त्यामध्ये त्याने प्रसादात विष घातले. मग तो खड्डाच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने तिथे पहिल्यांदा खड्डाची पूजा केली. त्यानंतर लक्ष्मण, उमेश आणि होतम यांना प्रसाद म्हणून लाडू आणि जलेबी खायला दिली. मग लगेच या तिघांची तब्येत बिघडली. होतमचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मणने कमी ला़डू आणि जलेबी खाल्ल्यामुळे तो फक्त बेशुद्ध झाला. उमेश तिथून निघून गेला आणि काही अंतर गेल्यावर त्याचा पण मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी खलीफा कुशवाह, थान सिंह कुशवाह आणि रामदास गुर्जर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली. जरी खलिफा कुशवाहा यांचे म्हणणे आहे की, त्याने फक्त लाडू आणि जलेबीमध्ये धतूराच्या बिया मिसळल्या होत्या आणि धतूराच्या बियाण्यापासून माणूस काही काळ बेशुद्ध होता, माणसाचा मृत्यू होत नाही. पण पोलिसांनी सांगितले की, या तीन जणांनी लाडू आणि जलेबीमध्ये विष मिसळल्यामुळे उमेश आणि होतम यांनी आपला जीव गमावला.


हेही वाचा – फॉरवर्ड मेसेजचे साईड इफेक्ट्स, जिवंत अभिनेत्रीलाच श्रद्धांजली वाहून मोकळे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -