घरदेश-विदेशभारत जोडो यात्रेदरम्यान खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन, यात्रा तात्पुरती थांबवली

भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन, यात्रा तात्पुरती थांबवली

Subscribe

लुधियाना : भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज, शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदयात्रेचा पंजाब टप्पा बुधवारी फतेहगढ साहिबमधील सरहिंद येथून सुरू झाला.

भारत जोडो यात्रा फिल्लौरला पोहोचली, तेव्हा चौधरी संतोख सिंग बेशुद्ध झाले. त्यांना फगवाडा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. चौधरी संतोख सिंह जालंधरचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा थांबविण्यात आली आहे. रविवारी चौधरी संतोख सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल. पण ही यात्रा साधेपणाने केली जाईल. त्यात त्यात संगीत किंवा नृत्य नसेल. खासदार संतोख यांच्यावर रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी धालीवाल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

चौधरी कुटुंबाच्या वतीने फिल्लौर बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली मोठे स्टेज उभारण्यात आले होते. चौधरी संतोख सिंग या स्टेजवर उभे राहून ‘जोडो जोडो भारत जोडो’च्या घोषणा देत होते. तेथून ते राहुल गांधींसोबत सुमारे दोन किलोमीटर चालत गेले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

पक्ष संघटनेला मोठा धक्का – खर्गे
चौधरी संतोख सिंग यांच्या निधनाने पक्ष आणि संघटनेला मोठा धक्का बसला असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. आमचे खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधन झाल्याचे ऐकून खूप धक्का बसला. त्यांचे जाणे हा पक्ष आणि संघटनेला मोठा धक्का आहे, अस ट्वीट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेदरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने जालंधरचे 76 वर्षीय काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे आज सकाळी निधन झाले. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो. कार्यक्रमात काही बदल होतील. त्यासंबंधीच माहिती लवकरच दिली जाईल, असे ट्वीट काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -