घरदेश-विदेशअफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा 1 हजाराच्या वर

अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा 1 हजाराच्या वर

Subscribe

भूकंपाचा सर्वाधिक फटका पाकिटिका आणि खोस्त भागाला बसला आहे. येथील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानमध्येही अफगाणिस्तानला लागून असलेल्या अनेक भागात विध्वंस झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू आग्नेय अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून 44 किमी अंतरावर होता.

अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचे (earthquake) धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 नोंदवण्यात आली. अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा 1000 च्या वर गेला असून जखमींची संख्या 1500 पेक्षा जास्त आहे. खोस्त आणि नांगरहार या पूर्वेकडील प्रांतांमध्येही मृत्यूची नोंद झाली आहे.

भूकंपाचा सर्वाधिक फटका पाकिटिका आणि खोस्त भागाला बसला आहे. येथील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानमध्येही अफगाणिस्तानला लागून असलेल्या अनेक भागात विध्वंस झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू आग्नेय अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून 44 किमी अंतरावर होता.

- Advertisement -

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानी मीडियानुसार, इस्लामाबाद आणि देशाच्या इतर भागात भूकंपाची तीव्रता सौम्य होती. पाकिस्तानमधील एका ट्विटर युजरने लिहिले, इस्लामाबादमध्ये भूकंप! अल्लाह खैर! आशा आहे की प्रत्येकजण सुरक्षित आहे. पाकिस्तानमध्येही खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. भूकंपामुळे घराचे छत कोसळले, त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा भूकंप पाकिस्तानी वेळेनुसार पहाटे 1.54 वाजता झाला. पेशावर, इस्लामाबाद, लाहोर आणि पंजाब आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या इतर भागात आणि भारतापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात असलेल्या खोस्टपासून 44 किमी अंतरावर 51 किमी खोलीवर हा भूकंप झाला. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात पाकिटिकामध्ये अधिक नुकसान झाले आहे. तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले की, भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. भूकंपात अनेक घरांचे नुकसान झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -