घरदेश-विदेशबांगलादेशामध्ये बोट उलटून आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा...

बांगलादेशामध्ये बोट उलटून आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश

Subscribe

बांगलादेशच्या पंचगढमध्ये रविवारी बोट उलटल्याने झालेल्या अपघातात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मृतांची संख्या 26 होती. ती आता 60 वर पोहचली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दीपंकर रॉय यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि 13 लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक एका बोटीतून बोडेश्वरी मंदिरात महालय (उत्सव) साजरा करण्यासाठी जात होते.

रविवारी दुपारी मारिया युनियनच्या औलिया घाटातून बोट उलटल्याची घटना घडली होती. ज्या घटनेस पंचगडचे उपायुक्त जहिरुल इस्लाम यांनी दुजोरा दिला आहे. बोट उलटल्यानंतर गोताखोरांचे पथक नदीत बचाव आणि मृतदेह शोधण्यास गुंतले होते. दरम्यान हे बचावकार्य पाहण्यासाठी हजारो लोकं नदी काठी जमले होते. बांगलादेशमध्ये बोटने प्रवास करण्यासाठी असलेल्या सुरक्षा मानके कमी केल्यामुळे आणि ओव्हरलोडिंगमुळे बोटींचे वारंवार अपघात होत आहे. बांगलादेश गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन प्रमुख नद्यांच्या खालच्या बाजूस वसलेले आहे. हा देश एकूण 230 नद्यांनी वेढलेला आहे.

- Advertisement -

नौदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बांगलादेशमध्ये शेकडो लहान आणि मध्यम आकाराच्या बोटींपैकी 95 टक्क्यांहून अधिक बोटी किमान सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत. . बांगलादेशातील लाखो लोक डेल्टा देशाच्या राजधानीत किंवा प्रमुख शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी बोटी आणि फेरीवर अवलंबून आहेत. मात्र या प्रवासादरम्यान बोट उलटून अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मालवाहू जहाजाला प्रवासी बोट आदळल्याने सुमारे 37 लोक बुडाले होते. त्याच वेळी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, देशाच्या दक्षिणेकडील भोला बेटावर ओव्हरलोड ट्रिपल डेकर बोट उलटल्याने किमान 85 लोक बुडाले होते. एका आठवड्यानंतर आणखी एक बोट बुडाली आणि 46 जणांचा मृत्यू झाला. या वर्षात आतापर्यंत बांगलादेशात अनेक छोट्या बोटींच्या अपघातात डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा विधेयक अखेर मागे; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -